Param Sundari title track : ‘मिमी’ सिनेमाच्या ‘परम सुंदरी’ गाण्यात दिसणार क्रिती सेनॉनचा ‘देसी’ अंदाज

kriti sanon upcoming film mimi s first song param sundari will be released on 16 july
Param Sundari title track : 'मीमी' सिनेमाच्या 'परम सुंदरी' गाण्यात दिसणार क्रिती सिनेनचा 'देसी' अंदाज

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा बहुचर्चित सिनेमा ‘मिमी’ लवकरच रिलीज होणार आहे. क्रितीने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर आता या सिनेमाचे पहिले गाणे ‘परम सुंदरी’ भेटीस येत आहे. या गाण्यातून क्रितीचा देसी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच सोनी म्युझिक इंडियाने ‘परम सुंदरी’ या गाण्याचे अधिकृत मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरोगसी आणि मुलाच्या जन्माची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात कृती सेनॉन एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीच्या भूमिका साकारत असून ती पैशासाठी परदेशी जोडप्याच्या बाळासाठी सरोगेट मदर होण्यास तयार होते. मात्र काही दिवसांनी हे जोडपे त्या बाळाला स्वीकारण्यास नकार देतात. हाच या चित्रपटातील ट्विस्ट आहे.

सध्या मिमी चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजवला आहे. या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी क्रिती सेनॉनला उत्तम प्रकारे साथ देताना पाहायला मिळाले. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात सुप्रिया पाठक, सई ताम्हणकर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता निर्माते ‘परम सुंदरी’ हे पहिले गाणे प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी या गाण्याच्या रिलीजची डेट जाहीर केली आहे. रिलीजच्या तारखेबरोबरच या गाण्यातील क्रिती सेनॉनचे देसी मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. .

या मोशन पोस्टरमध्ये क्रिती सेनॉन आपल्या देसी अंदाजात डान्स पोजमध्ये झळकली आहे. क्रिती या पोस्टरमध्ये अधिकचं ग्लॅमरस दिसतेयं. मिमी चित्रपटाचा प्रीमियर ३० जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे.


Corona Vaccination : लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राचे राज्याला सुचना