घरताज्या घडामोडीKriti sanon | क्रिती सेनन लिव्ह इनमध्ये राहून सरोगसीद्वारे होणार आई ?

Kriti sanon | क्रिती सेनन लिव्ह इनमध्ये राहून सरोगसीद्वारे होणार आई ?

Subscribe

बॉलीवूडमधील अभिनेत्री क्रिती सेनन ही आपल्या ग्लॅमरस अंदाजसाठीही ओळखली जाते. तसेच ती कूल लुक देखील अतिशय सहजरित्या कॅरी करते. क्रिती तिच्या स्पष्ट मत आणि भन्नाट अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.क्रिती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून, ती आपल्या चित्रपटांसाठीचे सर्व अपडेट्स सोशल मिडियावर शेअर करत असते. दरम्यान एका टीव्ही शोच्या कार्यक्रमात क्रितीने मांडलेले मत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये तिने  लिव्ह-इन रिलेशनशिप आणि सरोगसीवर आपले मत मांडले आहे आणि तिच्या या मताने सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

क्रिती सेननला लिव्ह-इन-रिलेशनशिप आणि सरोगसीबाबत तिचं मत विचारल्यावर ती म्हणाली की, लिव्ह – इन रिलेशनशिप आणि सरोगसी यात काही चुकीचे नाही, मात्र यासाठी माझे आई-वडील लगेच परवानगी देतील, असे मला वाटत नाही,याची काय गरज आहे? हे नक्कीच ते विचारू शकतात.परंतु माझी आई मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे बघूनच माझ्या निर्णयाचे स्वागत करेल.’जर तुम्हाला काही कारणास्तव मूल होत नसेल, तर सरोगसीचा निर्णय घेण्यात गैर काहीच नाही,असं देखील क्रितीने सांगितले.क्रितीने ‘मीमी’ चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. क्रितीने ‘मीमी’ चित्रपटाचे उदाहरण देत म्हणाली,’सरोगसीमध्ये काहीही चुकीचे नाही, सिनेमा सरोगसी कायद्यापूर्वी बनवलेला आहे.

- Advertisement -

प्रिती झिंटा सरोगसीव्दारे झाली जुळ्या मुलांची आई

हिंदी चित्रपटसृष्टीतील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली. १८ नोव्हेंबर २०२१मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली आहे.


हे ही वाचा – आर माधवनने सांगितला मुंबईच्या बीचवरील रोमान्सचा किस्सा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -