Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन कृति सेनेन सीतेच्या रुपात, नेसली 24 करेट सोन्याची साडी

कृति सेनेन सीतेच्या रुपात, नेसली 24 करेट सोन्याची साडी

Subscribe

अभिनेता प्रभास आणि कृती सेनन यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी लाँच करण्यात आला. यावेळी त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात कृतीने पांढर्या रंगाची सोन्याची साडी परिधान करून आली होती. तिने फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधून ही साडी निवडली. ज्यामध्ये तिचा मोहक पारंपारिक लूक खूप सुंदर दिसत होता. या साडीवर इंट्रीकेट डिजाइन करून तांबे आणि सोन्याचे काम करण्यात आले होते.

कृती सेननचे हे फोटो फॅशन स्टायलिस्ट सुकृती ग्रोव्हरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कस्टम डिझाईन केलेल्या पांढऱ्या साडीमध्ये दिसत आहे. या सुंदर साडीवर इंट्रीकेट डिजाइन दिसत होती. ही एक प्रकारची विंटेज साडी होती, जी केरळमधील कॉटन फॅब्रिकपासून बनवली गेली होती. साडीवर खादीच्या ब्लॉक प्रिंट्स दिसत होत्या आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला होता.

- Advertisement -

डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी सांगितले की, माता सीतेची भव्यता दाखवण्यासाठी या प्रकारची साडी
कृतीसाठी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये स्टाईलसोबत साधेपणाचा भावही पाहायला मिळाला.या लूकमधील आकर्षण वाढवण्यासाठी कृतीने सुंदर कानातले घातले होते. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्या होत्या. केसमध्ये तिने पांढऱ्या गुलाबाच्या गजरा घातला होता.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीता नवमीच्या मुहूर्तावर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल मीडियावर प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या या ऑडिओ टीझरच्या रिलीजसोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये देवी सीतेचे वर्णन देखील करण्यात आले होते. ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :

पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर बंदी; अनुराग कश्यपने व्यक्त केला संताप

- Advertisment -