Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी रणबीर-आलिया लग्नानंतर 'या' साली घेणार घटस्फोट; KRKची भविष्यवाणी

रणबीर-आलिया लग्नानंतर ‘या’ साली घेणार घटस्फोट; KRKची भविष्यवाणी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी आहे. कोरोनाच्या काळात दोघे एकमेकांना किती मिस करत होते, हे आलियाच्या पोस्टवरून सर्वांनाचं समजले होते. कारण दोघांना देखील कोरोनाची लागण झाली होती आणि त्यादरम्यान आलियाने मेजर मिसिंग असे लिहून एक फोटो शेअर केला होता. मग दोघे कोरोनामुक्त झाल्यानंतर एकत्र फिरायला देखील गेले होते. पण सध्या चाहते रणबीर-आलिया कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड वेडिंग्सपैकी रणबीर-आलियाचे लग्न आहे. पण लग्न करण्यापूर्वीच रणबीर-आलियाचा घटस्फोट केव्हा होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्याचं कारणं ही नेमकं तसंच आहे.

अभिनेता केआरके (KRK) म्हणजेच कमाल आर खान (Kamaal R Khan) नेहमी त्याच्या अजब दाव्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या अजब दाव्यामुळे तो ट्रोलर्सचा शिकार होतो. आता त्याने रणबीर-आलियाच्या लग्नाची भविष्यवाणी केली आहे. रणबीर-आलियाचे २०२२ पर्यंत लग्न होईल आणि लग्नाच्या १५ वर्षांनंतर म्हणजे २०३७ साली त्यांचा घटस्फोट होईल, असा दावा केआरकेने केला आहे. त्यामुळे सध्या केआरकेवर टीकेची झोड नेटकऱ्यांनी उठवली आहे.

- Advertisement -

नेटकऱ्यांनी केआरकेच्या ट्विटला काय उत्तर दिले?

एक नेटकरी म्हणाला आहे की, ‘देवा, तुम्ही महान आहे. माझं लग्न आणि घटस्फोट केव्हा होणार सांगा?’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘तुम्ही नेहमी चुकीचा अंदाज का लावता? काही चांगलं बोलू शकतं नाही का?’

- Advertisement -

 

अलीकडेच केआरकेने असे ट्विट केले होते की, ‘प्रियांका चोप्रा आणि निक जोनस १० वर्षात घटस्फोट घेतली.’ तसेच अजून एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘सैफ आणि करीना या दोघांची मुलं तैमूर आणि जेह कधीच आपल्या नावामुळे सुपरस्टार बनणार नाही.’


हेही वाचा – बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची गाथा उलगडणारा ‘पावनखिंड’ सिनेमा लवकरच


- Advertisement -