Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ईश्वरी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची - सुप्रिया पिळगावकर

ईश्वरी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची – सुप्रिया पिळगावकर

कथेची मांडणी प्रगल्भ आहे, व त्यातील पात्रे सूज्ञ आहेत

Related Story

- Advertisement -

प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी लवकरचं सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन येत आहे. कालांतराने नाती कशी बदलतात आणि देव व सोनाक्षी यांच्या नात्यात आता ‘प्यार आहे की दरार’ याचा शोध या मालिकेतून घेतला आहे. शहीर शेख, एरिका फर्नांडिस आणि सुप्रिया पिळगावकर या मालिकेत अनुक्रमे देव, सोनाक्षी आणि ईश्वरी या प्रमुख भूमिका पुन्हा एकदा साकारणार आहेत, ही प्रेक्षकांसाठी आनंददायक बाब आहे. आपल्या ईश्वरी या व्यक्तिरेखेबद्दल मोकळेपणाने बोलताना सुप्रिया पिळगावकर या ज्येष्ठ अभिनेत्रीने या नवीन सीझनबद्दल आपले विचार मांडले. आणि प्रेक्षकांसाठी यात काय असणार आहे, ते सांगितले. (kuch rang pyaar ke aaise bhi nae kahani Ishwari character very close to my heart – Supriya Pilgaonkar)

ईश्वरी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची आहे. ती माझ्यासाठी खास आहे. लोकांना ही व्यक्तिरेखा तर आवडलीच आहे. पण त्याच बरोबर पडद्यावर माझ्या आणि शहीर शेखच्या व्यक्तिरेखांमधून जे माय-लेकाचे नाते साकार झाले हे, ते नाते लोकांना खूप भावले आहे. या मालिकेची खासियत म्हणजे, यातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास प्रेक्षकाला खूप आपलासा वाटेल असा आहे. यातील कथेची मांडणी प्रगल्भ आहे, व त्यातील पात्रे सूज्ञ आहेत. या मालिकेचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे आणि पुन्हा एकदा त्या सर्व कलाकारांबरोबर काम करण्यास मी उत्सुक असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले.

- Advertisement -