‘कुमकुम भाग्य’ फेम शिखा सिंग बोल्ड टॉपलेस फोटोमुळे होतेय ट्रोल

शिखाने शेअर केलेल्या एका टॉपलेस फोटोमुळे सोशल मीडियावर शिखा सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा शिकार होत आहे. नेटकऱ्यांनी शिखाला चांगलचं धारेवर धरलं आहे.

'Kumkum Bhagya' fame Shikha Singh is a troll due to his bold topless photo
'कुमकुम भाग्य' फेम शिखा सिंग बोल्ड टॉपलेस फोटोमुळे होतेय ट्रोल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’ चा भला मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक वर्षापासून मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एकता कपूरच्या टेलिव्हिजन मालिकेत काम करणाऱ्या शिखा सिंग हिने शब्बीर अहलूवालियाच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपुर्वी शिखाने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. शिखा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसोबत व्यक्तीगत तसेच व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी  शेअर करते. पण शिखाने शेअर केलेल्या एका टॉपलेस फोटोमुळे सोशल मीडियावर शिखा सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा शिकार होत आहे. नेटकऱ्यांनी शिखाला चांगलचं धारेवर धरलं आहे.

शिखा सिंग सध्या तिच्या  प्रेग्नेंसीनंतरचे प्रत्येक दिवस एंजॉय करताना दिसत आहे. अनेक फोटोज,व्हिडीओ शिखा चाहत्यांसोबत शेअर करतेय. पण शिखाने केलेल्या एका पोस्टमुळे चाहते तिच्यावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे. लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने एक टॉपलेस फोटोशूट शेअर केला आहे. शिखा बेडवर न्यूड म्हणजेच नग्नआवस्थेत दिसत आहे. तसेच तिने शरीराला समोरुन व्हाईट उशीने झाकले आहे. शिखा फोटोमध्ये टोन्ड आर्म्स फ्लॉन्ट करत आहे. तसेच तिने अगदी लाइट मेकअप डार्क रेड कलरची लिपस्टिक लावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikha Singh Shah (@shikhasingh)

सोशल मीडिया यूजर्सना शिखाचा हा फोटो फारसा आवडा नाही. यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहले आहे की ‘मॅडम,तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये’. तर एकाने लिहले ‘थोडी तरी लाज बाळग’.इतकच नाही तर एकाने ‘मॅडम तुमचे कपडे कुठे गेले आहेत’. असा टोला नेटकऱ्यांनी शिखाला लगावला आहे.

याआधी सुद्धा शिखाला नेटकऱ्यांनी हैराण केलं होत शिखाने ब्रेस्टफीडिंग करताना एक पोस्ट शेअर केला होता त्यावेळी सुद्धा शिखा सिंग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती.हे हि वाचा – KGF 2:अभिनेत्री रवीना टंडनने पोस्ट शेअर करत लिहलं, मॉन्स्टर तेव्हाच येईल जेव्हा..