Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ...तर विराट कोहली माझा गळा कापेल; अनुष्का शर्माबद्दलच्या प्रश्नावर कुणाल कपूरचे उत्तर

…तर विराट कोहली माझा गळा कापेल; अनुष्का शर्माबद्दलच्या प्रश्नावर कुणाल कपूरचे उत्तर

Related Story

- Advertisement -

‘द इम्पायर’ ही वेब सीरिज सध्या चांगलीच गाजतेय. या वेब सीरिजमध्ये अभिनेता कुणाल कपूर, डीनो मोरिया आणि अभिनेत्री दृष्टि धामी मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतचं वेबसीरिजमधील कलाकारांनी करण जोहरच्या चॅट शोमध्ये पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली. या चॅट शोमध्ये करण जोहरने सर्व कलाकारांची चांगलीच शाळा घेत मनसोक्त गप्पा मारल्या.

‘द स्पेशल कॉफी शॉट्स विद करण’ च्या माध्यमातून करण जोहर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींना गोंधळात टाकणारे सवाल करत असतो. ‘द इम्पायर’ ही वेबसीरिज निमित्ताने झालेल्या एपिसोडमध्येही करणने कुणाल कपूरला काही मजेशीर प्रश्न केला. कुणाल कपूर या वेबसीरिजमध्ये मुघल शासक बाबरची भूमिका साकारत आहे. यावेळी करणने कुणाल कपूरला विचारलं की, “आलिया भट्ट, दीपिका पदूकोण आणि अनुष्का शर्मा यांच्यांमध्ये कुणाल कुणाशी लग्न करेल, कुणाला बंदी बनवेल आणि कुणाचा गळा कापशील?”

- Advertisement -

करणच्या या प्रश्नावर कुणालने देखील साजेस उत्तर दिले, कुणाला म्हणाला की, “मला वाटतं मी आलियाचा गळा कापेन कारण ती खूपचं हुशार आहे. मी अनुष्कासोबत लग्न करने, मात्र मला वाटतं यामुळे विराट कोहली माझाच गळा कापेल. तर दीपिका पदूकोणला मी बंदी करेन, कारण सुंदर आणि महागड्या वस्तूंना बंदिस्त ठेवलं पाहिजे.” असं कुणाल म्हणाला.

कुणालाने यावेळी विराटचही कौतुक केले. यावेळी करणने कुणालाला विराटला काय मेसेज देशील असाही प्रश्न केला. यावर कुणाल म्हणाला, “विराट तुम्ही या देशाची आन,बान, शान आहात, विराट कोहली तुम्ही महान आहात.”


sidharth shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कुटुंबियांचे ‘हे’ आहे ऑफिशियल स्टेटमेंट


- Advertisement -

 

- Advertisement -