‘गो गोवा गॉन २’ कधी येणार हे मला पण ठाऊक नाही – कुणाल खेमू

झॉम्बी आवडणाऱ्या चाहत्यांना गो गोवा गॉन २ या चित्रपटासाठी आणखी बराच वेळ वाट पहावी लागणार आहे.

Kunal Kemmu on Go Goa Gone 2 shoot delay
कुणाल खेमू : 'गो गोवा गॉन' कधी प्रदर्शित होणार मलाही ठाऊक नाही

‘गो गोवा गॉन २’ या देशी झॉम्बीपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘मार्च २०२१ मध्ये ‘गो गोवा गॉन २’ चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे’, अशी माहिती ‘मॅडॉक फिल्मस’ने मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे देण्यात आली होती. मात्र ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचा सिक्वल काही तांत्रिक अडचणीत अडकल्याने गेल्या काही वर्षांपासून हा पूर्ण होऊ शकला नाही, असे ‘गो गोवा गॉन’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता ‘कुणाल खेमू’ याने माहिती दिली आहे.

 

कुणाल खेमू ‘मलंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी बोलत होता. ‘गो गोवा गॉन २’ विषय एका प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की, ‘मी देखील या चित्रपटाकरीता तितकाच उत्सुक आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा मी देखील ऐकली आहे. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल हा प्रश्न मला देखील पडला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हा सिनेमा सुरु झालेला नाही. ‘अद्याप आम्ही या चित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी विचार केलेला नाही. पण मी सुद्धा या चित्रपटाकरिता उत्सुक आहे’ असे त्याने सांगितले.

२०१३ साली प्रदर्शित झालेला ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटात सैफ अली खान, कुमाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी हे मुख्य भूमिकेत होते. मात्र कुणाल खेमूच्या या प्रतिक्रीयेनंतर येणाऱ्या काळात या चित्रपटाचे भविष्य नेमके काय असणार याकडे झॉम्बी चाहत्यांचे लक्ष लागले आहे.