Kundali Bhagya फेम धीरज धूपर लवकरचं होणार बाबा; पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

kundali bhagya fame actor dheeraj dhoopar and wife vinny arora expecting first baby shares photos on internet
Kundali Bhagya फेम धीरज धूपर लवकरचं होणार बाबा; पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता धीरज धूपर त्याच्या ‘कुंडली भाग्य’ या शोमुळे खूप चर्चेत असतो. मात्र आता तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. धीरजने नुकतीच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. धीरज लवकरचं बाबा होणार आहे. त्याची पत्नी विनी अरोरा गरोदर आहे. त्यामुळे लवकरचं या जोडप्याच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्याने पोस्टद्वारे सांगितले की, त्याची अभिनेत्री पत्नी विनी अरोरा आणि तो त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यास तयार आहेत. ही बातमी समजताच आता चाहते दोघांचे अभिनंदन करत आहेत.

धीरजन आणि विनी यांनी इन्स्टाग्रावर त्यांचे काही फोटो शेअर केला आहेत. याच फोटोमध्ये विनी हातात सोनोग्राफीचा फोटो घेऊन धीरजला किस करत आहे. विनीने पांढऱ्या रंगाची जाळीदार असा स्टायलिस्ट पोशाख परिधान केला आहे. तर केसात पांढऱ्या रंगाचे फूल माळले आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही आशा करत आहोत की ऑगस्ट 2022 मध्ये एक छोटासा चमत्कार घडेल.’ आता या घोषणेनंतर दोन्ही स्टार्सना अनेक शुभेच्छा मिळू लागल्या आहेत. केवळ चाहतेच नाहीतर सेलिब्रिटीही या दोघांचे खूप अभिनंदन करत आहेत.

धीरज आणि विनी यांची भेट 2009 मध्ये ‘माता पित्ता के चरण में’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. शूटिंगदरम्यानच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि लवकरच या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या केमिस्ट्रीला ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. दरम्यान 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धीरज आणि विनीने 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यातून जात आहेत. या छोट्या पाहुण्यासाठी दोघेही खूप आनंदी आणि उत्साहित आहेत.


My Dad’s Wedding : गुढीपाडव्यानिमित्त सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा