Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'चला हवा येऊ द्या' च्या शुटींगला सुरूवात पण कलाकार म्हणतायत...

‘चला हवा येऊ द्या’ च्या शुटींगला सुरूवात पण कलाकार म्हणतायत…

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे जवळपास ३ महिने बंद असलेलं मालिकांच शुटींग आता हळूहळू सुरू झालं आहे. लॉकडाऊनचे आणि सरकारने घालून दिलेलं नियमपाळूनच शूटींगला परवानगी देण्यात आली आहे. सेटवर मोजकी लोकं, मास्क आणि सॅनिटायझेशनचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच शुटींगला सुरूवात झाली. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

 

या दोघांनी शेअर केलेल्या फोटीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. कुशल बद्रीकेने दिलेलं कॅप्शन मात्र भन्नाट आहे. ‘आज चार महिन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय. मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहित’, असं मजेशीर कॅप्शन कुशलने त्याच्या फोटोला दिलं आहे.

- Advertisement -

या फोटोत पीपीई किट घालून मेकअपमॅन कुशल आणि श्रेयाचा मेकअप करताना दिसतोय. मेकअप करताना त्याने पाळलेलं सोशल डिस्टन्सिंग पाहून कुशलला दिवाळीला फटाका लावतोय असं वाटतय.

‘चला हवा येऊ दे’ च्या शूटिंगला आता सुरूवात झाली आहे. मात्र यावेळी चित्रीकरणाला प्रेक्षक नसणार आहेत. येत्या काळात ‘न्यू नॉर्मल’मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. असं श्रेया बुगडे याविषयी बोलताना म्हणाली.


हे ही वाचा – अभिनेत्रीवर बलात्कार करताना आरोपीने व्हिडिओ केला शूट, तक्रार दाखल!


- Advertisement -