Kushboo Sundar – मी आठ वर्षाची असताना वडिलांनीच माझ्यावर…खुशबूचा खळबळजनक खुलासा

भिनय ते राजकारण असा प्रवास करणारी अभिनेत्री खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य झाली आहे. यादरम्यान तिने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत

अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारी अभिनेत्री खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य झाली आहे. यादरम्यान तिने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. मी आठ वर्षांची असताना वडिलांनीच माझं लैंगिक शोषण केलं होतं असा खळबळजनक खुलासा तिने केला आहे.

मोजो स्टोरीसाठी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना खुशबूने तिची लाईफ स्टोरीच जगासमोर मांडली आहे. यावेळी बोलताना खुशबूने सांगितले की एखाद्या लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होतात त्याची भिती कायम त्याच्या मनात असते. माझी आईदेखील अशाच एका विवाहसंबंधात राहात होती. ज्यात पत्नीला मारझोड, शिवीगाळ करणे आणि एकुलत्या एका मुलीचं लैंगिक शोषण करण हा त्या पुरुषाला जन्मसिद्ध अधिकार वाटायचा. ज्यावेळी त्याच्याकडून माझं लैंगिक शोषण करण्यात आलं शिवीगाळ करण्यात आली त्यावेळी मी अवघी ८ वर्षांची होती. अनेकवर्ष मी हा अत्याचार सहन केला. कारण माझ्या आईला कदाचित त्यावर विश्वास बसला नसता. कारण मी बघत होते की नवऱ्याचा अत्याचार सहन करूनही काहीजण त्याला देव मानत असतात. पण वयाच्या १५ व्या वर्षापासून मी या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली.त्यानंतर वडिलांनी मला आणि आईला सोडून दिलं. त्यानंतर जेवायलाही मिळत नव्हत. अनेक अडचणींचा सामना केला आणि द बर्निंग ट्रेन या चित्रपटापासून करियरला सुरुवात केल्याचे खुशबूने यावेळी सांगितले.

हिंदी चित्रपटांनंतर खुशबूने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. २०२० मध्ये तिने राजकारणात प्रवेश केला.


हेही वाचा :

मी तुम्हाला पुन्हा भेटेन… अमृता खानविलकरच्या पोस्टने खळबळ