घरताज्या घडामोडीKylie Jenner : काइली जेनर पुन्हा झाली आई ; सोशल मिडियावर PHOTO...

Kylie Jenner : काइली जेनर पुन्हा झाली आई ; सोशल मिडियावर PHOTO शेअर करत दिली Good News

Subscribe

हॉलीवूड स्टार आणि बिजनेस वुमन काइली जेनर दुसऱ्यांदा आई झाली आहे. या गोष्टीची तिने ऑफीशियली घोषणा केली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून काइली आणि ट्रैविस स्कॉट (Travis Scott) यांनी अशी घोषणा केली आहे की, त्यांच दुसरं मुल या जगात आलं आहे. त्यांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्याबद्दलची गोड बातमी देत, त्यांच्या दुसऱ्या मुलाला, 2 फेब्रुवारी 2022 रोजी झाला.

हॉलीवूड स्टार आणि बिझनेस वुमन काइली जेनर दुसऱ्यांदा आई झाली आहे. या गोष्टीची तिने ऑफीशियली घोषणा केली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून काइली आणि ट्रैविस स्कॉट (Travis Scott) यांनी अशी घोषणा केली आहे की, त्यांच दुसरं मुल या जगात आलं आहे. त्यांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्याबद्दलची गोड बातमी देत, त्यांच्या दुसऱ्या मुलाला, 2 फेब्रुवारी 2022 रोजी जन्म दिला आहे. काइली आणि ट्रैविसने त्यांच्या मुलाचा पहिला फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये काइली आणि मुलाचा हात दिसत आहे. फोटो शेअर करताना काइलीने कॅप्शनमध्ये लिहिले की – ‘2/2/22.’ यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

- Advertisement -

अनेक हॉलिवूड स्टार्सनी काइली आणि ट्रैविसला पालक आई-बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काइलीने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही, त्यामुळे चाहते तिला मुलाचा फोटो शेअर करण्याची विनंती करत आहेत. यापूर्वी, तीन वर्षांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या मुलीला स्टॉर्मी वेबस्टरला जन्म दिला होता. आता स्कॉट आणि काइलीचे हे दुसरे अपत्य आहे. काइलीने तिचे फोटो शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

काइलीने काही दिवसांपूर्वीच तिची मुलगी आणि ट्रैव्हिससोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिघेही पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसत होते. ट्रॅव्हिस आणि काइलीच्या चाहत्यांनी या कौटुंबिक फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला. आता काइलीला तिच्या दुसर्‍या मुलासाठी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. याआधी काइली जेनरनेही तिच्या मातृत्वाच्या फोटोंमुळे खूप चर्चेत आली होती.

- Advertisement -

 


हे ही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी प्रतिकारकशक्ती करायची आहे मजबूत?, तर प्या ‘हे’ पेय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -