Kylie Jenner ने रचला इतिहास; ठरली Instagram वर 300 मिलियन फॉलोअर्स असलेली जगातील पहिली महिला

इन्स्टाग्रामवरील फोटोंना सर्वाधिक लाइक मिळवण्याचा विक्रम कायली जेनरने केला आहे. मात्र बरेच दिवस सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर 2021 च्या ख्रिसमसनिमित्त ती सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली. तिने त्यावेळी आई क्रिस जेनरचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यानंतर पुन्हा दोन गर्भधारणेचे फोटो पोस्ट केले.

kylie jenner is the first woman to reach 300 million followers on instagram
Kylie Jenner ने रचला इतिहास; Instagram वर 300 मिलियन फॉलोअर्स असलेली जगातील पहिली महिला

लोकप्रिय हॉलिवूड मॉडेल आणि बिजनेसमन कायली जेनरने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक नवा इतिहास रचला आहे. काललीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) 300 दशलक्ष म्हणजेच 30 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. असे करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे. कायलीच्या या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीने तिने पॉप स्टार एरियाना ग्रांडेलाही मागे टाकले आहे.

अब्जाधीश असलेल्या कायली जेनरने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी लिप किट नावची कॉस्मेटिक लाइन सुरू केली होती. पण नंतर ती प्रचंड लोकप्रिय झाली आणि मग कायलीनं तिचं नाव बदलून कायली कॉस्मॅटिक्स असं केलं. याच बिझनेसमधून कायली आज अब्जावधीची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योजिका झाली आहे. तर सोशल मीडियावरही तिच्याच नावाचा बोलबाला आहे.

फॉलोवर्सच्या बाबतीत, 24 वर्षीय कायली जेनर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोनाल्डो 388 दशलक्ष फॉलोअर्ससह इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती आहे. त्याचे इस्टाग्रामचे अधिकृत अकाऊंट 460 दशलक्ष फॉलोअर्ससह टॉपवर आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंस्टाग्रामवर तुलनेने कमी प्रोफाइल टॉपवर ठेवले असतानाही कायलीने फॉलोवर्सचा 300 दशलक्षांचा टप्पा गाठला आहे. कायली तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःच्या कॉस्मेटिक्स प्रोडक्टसोबतच स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

इन्स्टाग्रामवरील फोटोंना सर्वाधिक लाइक मिळवण्याचा विक्रम कायली जेनरने केला आहे. मात्र बरेच दिवस सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर 2021 च्या ख्रिसमसनिमित्त ती सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली. तिने त्यावेळी आई क्रिस जेनरचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यानंतर पुन्हा दोन गर्भधारणेचे फोटो पोस्ट केले.


Baiju Bawra : भन्साळींच्या ‘बैजू बावरा’मध्ये आलिया-रणवीरची एन्ट्री