Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘Laal Singh Chaddha’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे ट्रेलर लॉंच झाले असून हा ट्रेलर रविवारी पार पडलेल्या IPL 2022 च्या शेवटच्या सामन्याच्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडिमध्ये रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूरसुद्धा दिसून येत आहे. या जबरदस्त ट्रेलरला प्रेक्षकांचाही प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असून हा ट्रेलर भावनिक, रोमांच आणि क्लाइमॅक्सने परिपूर्ण आहे. मात्र हा ट्रेलर पाहून तुम्हाला ‘थ्री इडियट’ची नक्कीच आठवण होऊ शकते. आमिर आणि करिनाच्या जोडीला आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र पाहिलेले आहे. या ट्रेलरमध्ये आमिर खानने साकारलेल्या भूमिकेच्या लहानपणापासून ते तरूणपणापर्यंतचा प्रवास दाखण्यात आला आहे. त्यामध्ये कधी तो सिख तर कधी सेनेच्या जवानाच्या वेशात दिसून येत आहे.तसेच या चित्रपटात एका सामान्य व्यक्तीची असामान्य कथा दाखण्यात आली आहे.

अद्वैत चंदन यांच्या दिग्दर्शनात बनलेला आमिर खानच्या या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूरशिवाय टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य, मोना सिंह या कलाकारांनीही काम केले आहे. तसेच ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे.’लाल सिंह चड्ढा’ येत्या ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :Hambirrao : मुलांना जगणं शिकवायचं तर ‘हा’ चित्रपट दाखवा; कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा