‘आमच्या जीवाला धोका’, ‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाणची खळबळजनक पोस्ट

lagir zal ji fame nitish chavans instagram post went viral
lagir zal ji fame nitish chavans instagram post went viral

‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अभिनेते डॉ.ज्ञानेश माने या कलाकाराचे अपघाती निधन झाले. मात्र काही ठिकाणी याच कलाकाराऐवजी नितीश चव्हाण याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे चाहतेवर्गातून शोक व्यक्त केला जात होता. मात्र, काही वेळातच सत्य समोर आले आणि नितीशच्या चाहत्यांनी दिलासा व्यक्त केला. नितीशने लागिर झालं जी या मालिकेतून अज्याची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती.परंतु नितीश चव्हाण त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची पोस्ट पाहून नेटकरी आणि प्रामुख्याने त्याचा चाहतावर्ग चकित झाला आहे.

नुकताच नितीश चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अशी पोस्ट केली आहे, की सर्वांनां धक्का बसला आहे. या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्याच्या हातात एक फलक आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकायं’.अशा आशयाचे मजकूर लिहिलेला फलक घेऊन नितीशने फोटो शेअर केला आहे. या फोटोमागे नक्की अर्थ काय? या फोटोमागील नेमके रहस्य काय?, असे अनेक प्रश्न नितीशच्या चाहत्यांना पडले आहेत.

‘मी आत्तापर्यंत सोशल मीडियावर माझ्या रिलेशनबद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत. पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.

अभिनेत्यानं अजून याबद्दल काही खुलासा केलेला नाही. ही पोस्ट नक्की काय आहे. हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. नेटकरी नितीश आगामी प्रोजेक्टचं प्रोमोशन करत असल्याचं म्हटलं जात आहे. या पोस्टखाली अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. नक्की मानसी आणि नितीश यांच लग्न झालं आहे का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये नितीश आणि मानसी एकत्र दिसतील असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.