Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन बॉयज ३ मधील 'लग्नाळू' गाणं प्रदर्शित; नवीन व्हर्जनचा हटके तडका

बॉयज ३ मधील ‘लग्नाळू’ गाणं प्रदर्शित; नवीन व्हर्जनचा हटके तडका

Subscribe

सगळीकडे धमाल, मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज ३’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू २.०’  हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. (lagnalu song from boys 3 released)

‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे. इतक्या वर्षांनंतरही  हे गाणे प्रत्येक रंगमंच हादरवून टाकू शकतो. त्यात त्याचे २.० व्हर्जन म्हणजे तर प्रेक्षकांसाठी सोने पे सुहागा.

- Advertisement -

या गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ” ज्या गाण्याने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे, त्याचे पुढचे व्हर्जन बनवून प्रेक्षकांना अजून खूश करण्याची ही मोठी संधी माझ्याकडे होती आणि ‘लग्नाळू २.०’ या गाण्यालाही प्रेक्षक तितकाच भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशा आहे.”

>

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -