‘लक्ष्मी निवास’ मध्ये जान्हवी साकारत असलेली दिव्या पुगावकर म्हणाली “2024ची बेस्ट आठवण, जेव्हा मला कळले की मी लक्ष्मी निवास ही मालिका करत आहे. माझी नेहमी मनापासून इच्छा असते कि माझं एक कामं झालं कि माझ्या हातात दुसरं कामं असावं आणि माझ्यासाठी ती अचिव्हमेंट आहे. मी या क्षेत्रात ७-८ वर्ष कामं करत आहे पण नेहमी माझ्या हातात काम राहिले आहे. पुढेही असंच राहू दे. फक्त माझ्यासाठी नाही तर इतर कलाकारांसाठीही. 2024 मध्ये माझं ड्रायविंग शिकायचं राहून गेलंय.”
लक्ष्मी साकारत असलेल्या हर्षदा खानविलकर म्हणतात – “2024 मध्ये मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला वेगळ्या प्रकारची भूमिका करायची आहे. मी माझ्या मित्र परिवारासमोर बोलायचे मला सोशिक आणि सोज्वळ भूमिका करायची आहे. त्यांच्यासाठी ती मस्करी होती कारण मी नेहमीच सशक्त महिलेच्या भूमिका केल्या आहेत. मी स्वतःही पूर्ण वर्षभर विचार करत होते कि मी सोज्वळ भूमिका करू शकेन का? या आधी मी जे कामं केले आहे ते छान होते पण मला काही तरी वेगळं करायचे होते. मी युनिव्हर्स मध्ये ही गोष्ट बोलत राहिले कि मला अशी एक भूमिका करायची आहे आणि युनिव्हर्सने मला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेद्वारा ती भूमिका दिली. लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल आहे. 2024 मध्ये मला फिरायला जायचे होते पण बॅक टू बॅक काम करत असल्यामुळे ते शक्य नाही झाले पण काम करत होते तर ही चांगली गोष्ट आहे.”
‘लक्ष्मी निवास’ मध्ये भावना साकारत असलेली अक्षया देवधर म्हणाली – ” माझ्यासाठी 2024 कमाल वर्ष होतं, जरी त्याची सुरुवात तितकीशी बरी झाली नव्हती. पण वर्ष माझ्यासाठी छान होतं. 2024 मध्ये मी पुन्हा एकदा झी मराठीवर काम करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट मला नेहमीच व्यवसाय करायचा होता, तर 2024 मध्ये मी बिजनेस वूमन सुद्धा झाले. तशा आयुष्यात करायच्या राहिलेल्या अनेक गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मला वाटते कि मी वजन कमी करायची प्रक्रिया थोडी आधी सुरु केली पाहिजे होती. ती उशिरा सुरु केली. 2024 मला हे शिकवून जात आहे की कम्फर्ट झोन सोडावाच लागतो मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा वैयक्तिक.”
बघायला विसरू नका नवी मालिका “लक्ष्मी निवास’ झी मराठीवर.
हेही वाचा : Swapnil Joshi : स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले हायस्ट ग्रोसिग फिल्म !
Edited By – Tanvi Gundaye