Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनLakshmi Niwas Serial : जान्हवी आणि भावनाचं आयुष्य काय नवीन वळण घेणार?

Lakshmi Niwas Serial : जान्हवी आणि भावनाचं आयुष्य काय नवीन वळण घेणार?

Subscribe

झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेतील जयंतचे विचित्र वागणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता काय तर जान्हवी तिचा पती जयंतसाठी टोपणनाव शोधू शकत नाही, म्हणून तो तिला शिक्षा देतो. पण तिचं दु:ख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो. विश्वाच्या खोलीत तनूला जाह्नवीने दिलेली साखळी सापडते आणि यामुळे विश्वाला पुन्हा जान्हवीची आठवण होते. तर दुसरीकडे, जयंत जान्हवीचा फोन हातात घेतो आणि तिने विश्वाला पाठवलेल्या व्हॉइस नोट आपल्या फोनवर ट्रान्सफर करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तो संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकतो. (Lakshmi Niwas Serial Update Janhvi & Bhavanas life is about to take turn)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

विश्वाने दिलेल्या उत्तरावरून जयंत या निष्कर्षावर पोहोचतो की, जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाच्या आग्रहाखातर केलं आहे. जयंत या ‘मॅड’विषयी माहिती गोळा करतो आणि ज्यामुळे त्याचा जान्हवीविषयी गैरसमज वाढतच जातो. दरम्यान, जयंत विश्वाच्या मागावर जातो आणि त्याच्या मागे जाताना एका दुकानात पोहोचतो. जिथे जान्हवीचं गाणं वाजत असतं. ज्यामुळे जयंत आणि विश्वा दोघेही एकदम भारावून जातात. जयंत चुकून विश्वा समजून दुसऱ्याच माणसाचा पाठलाग करतो आणि त्याला मारहाण करतो.

जयंत, विश्वाला मारल्याच्या आनंदात जान्हवीसोबत डिनर एन्जॉय करू लागतो. यावेळी जयंत आणि जान्हवी दोघेही काही रोमँटिक क्षण एकत्र घालवतात. तर दुसरीकडे भावना, गाडे- पाटील यांच्याशी बोलताना सांगते की तिचं संपूर्ण आयुष्य आनंदीभोवती फिरत आहे. तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही. हे ऐकून सिद्धू अस्वस्थ होतो. जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात येतं आणि जिथे मारहाण केली तिथे तो परत जाण्याचा निर्णय घेतो. आता जयंत पुन्हा त्या जागी गेल्यानंतर जे होणार आहे ते पाहून प्रेक्षकसुद्धा हादरतील. आता जयंत आणि विश्वाचा सामना होणार का? भावनाचा लग्न न करण्याचा विचार सिद्धू बदलू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मालिकेचे पुढील भाग पहावे लागणार आहेत.

हेही पहा –

Kiara Advani : कियाराला स्वतःच्या मुलीत हवे करीना कपूरचे हे गुण, म्हणाली