घरमनोरंजनलाल सिंग चड्ढाच्या 'तुर कलेयां' गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित

लाल सिंग चड्ढाच्या ‘तुर कलेयां’ गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित

Subscribe

या गाण्यात, निर्मात्यांनी देश आणि तिथल्या संस्कृतीच्या अनोळखी कथा सांगणाऱ्या प्रत्येक अनपेक्षित स्थानाला चित्रीत करून भारत आणि तेथील लोकांचे सौंदर्य टिपले आहे

लाल सिंग चड्ढा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे आणि निर्माते चित्रपटाशी संबंधित सर्व गुपिते एक-एक करून उघड करत आहेत. आता निर्मात्यांनी ‘तूर कलेयां’ गाण्याचा संगीत व्हिडिओ प्रदर्शित केला असून, तो आतापर्यंतच्या सर्वोत्तम शॉट व्हिडिओंपैकी एक झाला आहे. ‘तूर कलेयां’ हे गाणे केवळ चित्रपटातील सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक नसून लाल सिंग चड्ढाच्या परिवर्तनीय प्रवासावर प्रकाश टाकतो, जो शेवटी जीवनातील सर्व अडचणींना न जुमानता स्वतःवर प्रेम करायला शिकतो. अरिजित सिंग, शादाब फरीदी आणि अल्तमाश फरीदी यांनी गायलेले, प्रीतम यांनी संगीत दिलेले आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. या मोटिव्हेशनल गाण्याला देशभरातून प्रेम आणि दाद मिळाली आहे.

‘तुर कलेयां’ हा चित्रपटातील सर्वात मोठा शॉट सीक्वेन्स आहे आणि चित्रपटात लाल सिंग चड्ढाची भूमिका साकारणाऱ्या आमिर खानने हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. या गाण्यात, निर्मात्यांनी देश आणि तिथल्या संस्कृतीच्या अनोळखी कथा सांगणाऱ्या प्रत्येक अनपेक्षित स्थानाला चित्रीत करून भारत आणि तेथील लोकांचे सौंदर्य टिपले आहे.

- Advertisement -

आमिर खानने ‘तुर कलेयां’च्या म्युझिक व्हिडिओचे चित्रिकरण गुडघे दुखत असताना देखील केले होते आणि तरीही गाण्यात त्याचे सर्वोत्तम शॉट दिले आहेत. खरं तर, निर्मात्यांनी ठराविक शॉट्स मिळविण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये अनेक महिने प्रवास केला, जे व्हिडिओमध्ये केवळ काही सेकंदांसाठी असणार होते.आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :‘लाल सिंग चड्ढा’च्या ‘कहानी’ गाण्याचा बहुप्रतिक्षित म्युझिक व्हिडिओ रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -