लग्नाच्या अफवेनंतर ललित मोदींनी केला खुलासा, म्हणाले सुश्मिता सेनसोबत…

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बॉलिवडू अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्यासोबत लग्न केल्याच्या चर्चा उठल्या होत्या. मात्र, त्यांनी लग्न केले नसून ते एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा ललित मोदी यांनी केला आहे.

काही वेळापूर्वी ललित मोदी यांनी ट्विट करून माझ्या आयुष्याची नवी सुरुवात असं म्हणत सुश्मिता सेन हिच्यासोबतचा फोटो टाकला होता. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, ललित मोदी यांनी पुन्हा ट्विट करत आम्ही लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत असल्याचा निर्वाळा दिला आहे.

मिस युनिर्व्हस असलेली सुश्मिता सेन ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा फॅशन सेन्स, तिची बोलण्याची पद्धत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. महिन्याभरापूर्वीच रोहमन शॉलसोबत तिचा ब्रेकअप झाला होता. मात्र, महिन्याभरातच तिच्या दुसऱ्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्या ट्विटमध्ये ललित मोदी म्हणाले की, मालदिव आणि सारदिनीआ येथे कुटुंबासोबत ग्लोबल टूर केल्यांतर आम्ही लंडनला पोहोचलो आहोत. माझी बेटर हाफ सुश्मिता सेन हिच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात.

 


त्यांच्या या ट्विटनंतर सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांनी गुपचूप लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, अर्ध्या तासात त्यांनी दुसरं ट्विट करून आम्ही लग्न केलं नसून एकमेकांसोबत नात्यात आहोत, असं सांगितलं.

ते दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले की, आम्ही लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत आहोत. पण एक दिवस नक्की लग्न करू.

कोण आहे ललित मोदी?

ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. जवळपास तीन वर्षे ते आयपीच्या अध्यक्षपदी होते. तसेच, चॅपिअन्स लीग टी२० च्या अध्यक्षपदीही ते होते. शिवाय, बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी पाच वर्षे सांभाळला आहे. तर, राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही ते होते.

सिंगल मदर

दरम्यान, सुश्मिता सेन अॅक्टर रोहमन शॉल याला डेट करत होती. तो तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात रोहमन दिसला आहे. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा खुद्ध सुश्मिता सेन हिनेच केला होता. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तसेच, सुश्मिता सेन ही सिंगल मदर आहे. तिला दोन मुली असून या दोन्ही मुली तिने दत्तक घेतल्या आहेत. रेनी आणि अलिषा अशी या दोघींची नावे आहेत.

सुश्मिता सेन हिने १९९४ साली मिस युनिर्व्हसचा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने बॉलिवडूमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. विक्रम भट्ट आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबतची सुश्मिताची अफेअर खूप गाजली मात्र याव्यतिरिक्त ऋतिक भसीन, बंटी सजदेह, संजय नारंग, शबीर भाटिया, इम्तियाज खत्री, मुदस्सर अजीज, वसीम अकरम आणि मानव मेनन यांच्यासोबतही सुश्मिताचं नाव जोडलं गेलं होतं.