घरमनोरंजन‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी सिनेगृहात झळकणार!

‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी सिनेगृहात झळकणार!

Subscribe

जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांनी किरण राव दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लापता लेडीज’ प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. १ मार्च २०२४ रोजी ‘लापता लेडीज’ सिनेगृहांमध्ये दाखल होत आहे. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील विनोदी जगाची एक आनंददायी झलक या चित्रपटाच्या टीझरमधू सिनेप्रेक्षकांपर्यंत आधीच पोहोचली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट अनुभवण्याची उत्सुकता लागली आहे. अलीकडेच प्रतिष्ठित ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव यांना मानवंदना दिली, अशा पद्धतीने या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करीत जागतिक स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.

प्रेक्षकांची उत्कंठा अधिक शिगेला नेण्याकरता, निर्मात्यांनी ‘लापता लेडीज’च्या विलक्षण दुनियेत डोकावता येईल, अशा एका नवीन पोस्टरसह या विनोदी, रंजक अशा चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असून सिनेरसिकांना एक सिनेमॅटिक मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे, या चित्रपटाने आधीच जागतिक स्तरावर खूप वाहवा प्राप्त केली आहे. १ मार्च २०२४ ही तारीख लक्षात ठेवा, कारण त्या दिवशी एक शोध सुरू होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

- Advertisement -

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘किंडलिंग प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे. चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांचे असून, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -