Oscars 2022 ला भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा विसर; भारतीय चाहत्यांचा संताप

lata mangeshkar and dilip kumar does not pay tribute in oscars 2022 fans got angry
Oscars 2022 ला भारताच्या गाणसम्राधीनी लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा विसर, भारतीय चाहत्यांचा संताप

कॅलिफोर्नियामधील लॉस एन्जेलिस (Los Angeles in California) येथील डॉल्बी थिएटरमध्ये (Dolby Theater) आज 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली. यावर्षी विल स्मिथला किंग रिचर्डसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर कोटा हा यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ममोरियम मध्ये त्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला ज्यांनी गेल्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या सेलिब्रिटींमध्ये सिडनी पॉटियर, बेटी व्हाईट, इव्हान रीटमन, स्टीफन सोंधेम यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचे नाव यात नसल्याने आता भारतीय चाहते चांगलेच संतापले आहेत. चाहत्यांनी आता ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांच्या आठवणींना ऑस्कर 2022 मध्ये उजाळा न दिल्याने चाहते ट्विटरवर नाराजी व्यक्त करत आहेत. लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात विश्वविक्रम सेट केला असे असतानाही प्रतिष्ठेच्या या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा नावाचा साधा उल्लेखही नाही. तर दिलीप कुमार यांच्या आठवणींनाही या पुरस्कार सोहळ्यात स्थान न मिळाल्याने चाहत्यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर संताप व्यक्त केला आहे.

लता दीदींचा भारतरत्न पुरस्काराने झाला सन्मान

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता. 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक दशके 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर 3 वेळा त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला. लताजींनी ‘ए मेरे वतन के लोगों’, ‘लग जा गले’ सारखी कधीही न विसरता येणारी गाणी गायली आहेत. मात्र 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी सुमारे महिनाभर त्या आजारी होत्या. त्यांना कोरोना व्हायरस आणि न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अनेक दिवस त्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत होत्या, पण ६ फेब्रुवारीला भारतरत्न लता मंगेशकर जीवनाची लढाई हरल्या.

दिलीप कुमार यांनी 2021 मध्ये घेतला जगाचा निरोप

दिलीप कुमार हे बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते होते, त्यांच्याशिवाय कदाचित हिंदी चित्रपटसृष्टी अपूर्ण राहिली असती. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. देशभक्तीवर आधारित त्यांच्या चित्रपटांनी देशवासियांची विचारसरणी बदलून टाकली. आयुष्याचा शेवटचा काळात ते आजारी होते. 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.


मात्र ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील या मोठ्या कलाकारांचा यंदा विसर पडला आहे. ऑस्करने यापूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आदरांजली वाहिली आहे.  2017 साली ऑस्करमध्ये ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तर 2018 मध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. 2020 मध्ये इरफान खान यांच्या आठवणींना ऑस्करमध्ये उजाळा देण्यात आला. याशिवाय ‘मेमोरिअम’ सुशांत सिंग राजपूत आणि कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली होती. मात्र भारतातील ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची आठवण यंदा या पुरस्कार सोहळ्यात काढण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.


Oscar 2022 | ऑस्कर पुरस्कारामध्ये ड्युनने लगावला सिक्सर; पाहा संपूर्ण यादी