घरताज्या घडामोडीLata Mangeshkar:...म्हणून लता मंगेशकरांनी किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंगला दिला होता नकार

Lata Mangeshkar:…म्हणून लता मंगेशकरांनी किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंगला दिला होता नकार

Subscribe

भारतरत्न लता मंगेशकर यांनी बॉलिवूडसाठी अनेक उत्तम आणि अजरामर गाणी गायलीत, त्यापैकी बरीच गाणी त्यांनी किशोर कुमारसोबत गायलीत. या दोन दिग्गज गायकांसोबत गाण्याचे प्रत्येक तरुण गायकाचे स्वप्न असते, पण लतादीदींच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांनी किशोर कुमारसोबत गाणे गाण्यास नकार दिला होता. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी ‘तुम आ गये हो नूर आ गया है’, ‘आप की नजरों ने समझा’ यांसारखी अनेक हिट गाणी एकत्र गायलीत. आजही लोक त्यांची प्रसिद्ध गाणी गातात आणि गुणगुणतात. पण काही काळानंतर लतादीदींनी किशोर कुमारसोबत गाणे रेकॉर्ड करण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे किशोर कुमार यांची विनोद करण्याची सवय आहे, त्यामुळे लता मंगेशकर नाराज झाल्या होत्या. जेव्हा गीतकार समीर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला, तेव्हा त्याने हा मजेदार किस्सा लोकांना सांगितला.

ही गोष्ट लतादीदींनी समीरला सांगितली

गीतकार समीरने कपिल शर्माच्या शोमध्ये हा मजेशीर किस्सा सांगितलाय. किशोर कुमार यांच्याशी संबंधित ही गोष्ट लतादीदींनीच त्यांना सांगितली होती. ते म्हणतात, ‘लतादीदी आणि आशाजींनी काही काळानंतर किशोर कुमारसोबत गाणे गाण्यास नकार दिला होता. लतादीदींनी समीरला सांगितले होते की, किशोर कुमार यायचे आणि आम्हा दोघींना जोक्स सांगून खूप हसवायचे. त्यानंतर आम्हाला कंटाळा यायचा आणि ते स्वतः गायचे. त्यामुळेच लतादीदींनी किशोर कुमारसोबत गाणे गाण्यास नकार दिला होता.

- Advertisement -

मात्र, त्यानंतर दोघे पुन्हा गाण्यासाठी एकत्र आले होते. गीतकार समीरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते की, ‘लता आणि किशोर यांना खूप दिवसांनी गाण्यासाठी एकत्र यावे लागले होते. तुम्ही एकत्र गाणे गायले नाही तर खूप त्रास होईल, असंही दोघांना सांगितल्याची समीर यांनी आठवण करून दिली.

जेव्हा लतादीदी आणि किशोर कुमार पुन्हा एकत्र आले होते. त्या दिवसाची आठवण करून देताना समीर सांगतात की, ‘त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किशोर कुमार पहिले आले होते. लतादीदी आल्याबरोबर किशोर कुमार त्यांच्याकडे गेले आणि कथा सांगायला सुरुवात केली. यावर लतादीदी म्हणाल्या होत्या की, मला आधी गाणे म्हणू द्या, मग मी कथा ऐकेन. ते गाणं होतं ‘सुनो कहो, कहा सुना’.

- Advertisement -

हेही वाचा – Lata Mangeshkar: लतादीदींच्या निधनानंतर ए.आर.रहमान झाला भावूक; म्हणाला…


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -