Lata Mangeshkar Health Update: दिलासादायक! लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, प्रार्थनेसाठी कुटुंबियांनी मानले आभार

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र तरीही त्यांना काही दिवस डॉक्टर प्रतीत समदानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत

Lata Mangeshkar Health Update official statement said he showing signs of improvement
Lata Mangeshkar Health Update: दिलासादायक! लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, प्रार्थनेसाठी कुटुंबियांनी मानले आभार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  दाखल करण्यात आले. लता दीदींच्या वयामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम आणि मंगेशकर परिवाराने लता दीदींच्या हेल्थ अपडेटची माहिती दिली आहे.

लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे माहिती देत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात उपचार घेत असून त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. आज सकाळी त्यांची एक्सट्यूबेशनची चाचणी करण्यात आली म्हणजेच त्यांचा व्हेंटिलेटर बंद करुन ट्रायल करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र तरीही त्यांना काही दिवस डॉक्टर प्रतीत समदानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत’, असे मंगेशकर कुटुंबियांनी म्हटले आहे.

28 जानेवारी देणार हेल्थ अपडेट 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार,लता मंगेशकर यांची नातेवाईक रचनाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज लता दीदींचे हेल्थ अपडेट देणे त्यांच्या परिवाराला शक्य नाही. लता दीदींच्या प्रकृतीबाबतचे अपडेट 28 जानेवारी रोजी देणार आहोत.

काही दिवसांपूर्वी लता दीदींच्या कुटुंबियांनी प्रायव्हसीची मागणी केली होती. दररोज लता दीदींचे हेल्थ अपडेट देणे शक्य नाही. त्यामुळे वेळेचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करा असे त्यांनी म्हटले होते.


हेही वाचा – Lata Mangeshkar लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून अयोध्येत पूजाअर्चा, होम हवन