घरमनोरंजनलतादीदींच्या निरोपादरम्यान मराठी कलाकार कुठे होते? हेमांगी कवी म्हणते...

लतादीदींच्या निरोपादरम्यान मराठी कलाकार कुठे होते? हेमांगी कवी म्हणते…

Subscribe

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर गेली अनेक दिवस कोरोना आणि न्यूमोनिया संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे. याशिवाय बॉलिवूड आणि मराठी सिने क्षेत्रातील कलाकारांनीही लतादीदींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. मात्र यात मराठी कलाकार कुठेच दिसले नाहीत? असा सवाल आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावर आता अभिनेत्री हेमांगी कवी हिने उत्तर दिले आहे.

- Advertisement -

लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी छत्रपती शिवाजी पार्कवर मराठी कलाकार दिसले नाहीत. तर बरेच हिंदी कलाकारही उपस्थित नव्हते. कलाकारांना प्रवेश बंदी होती का? अशी पोस्ट करत एका युझर्सने सवाल उपस्थित केला. यावर हेमांगी कवीने सविस्तर उत्तर दिले आहे.

हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिले नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर 4 वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं.

- Advertisement -

तिने पुढे लिहिले की, संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रीटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं. हेमांगीच्या या पोस्टमुळे आता लतादीदींच्या अंत्यसंस्करावेळी मराठी कलाकार कुठे होते असा प्रश्न विचारणाऱ्यांना योग्य उत्तर मिळाले आहे.

प्रकृती बिघडल्याने लता मंगेशकर यांना शुक्रवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Lata Mangeshkar Passes Away: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे देहावसान


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -