घरताज्या घडामोडीLata mangeshkar- लतादीदींना शिक्षण पूर्ण न करताही मिळाल्या होत्या नामांकित विद्यापीठांच्या ६...

Lata mangeshkar- लतादीदींना शिक्षण पूर्ण न करताही मिळाल्या होत्या नामांकित विद्यापीठांच्या ६ पदव्या

Subscribe

लतादीदींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पण तरीही त्यांना जगातील नामांकीत विद्यापीठांच्या सहा पदव्यांनी गौरवण्यात आले होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लतादीदींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पण तरीही त्यांना जगातील नामांकीत विद्यापीठांच्या सहा पदव्यांनी गौरवण्यात आले होते.

लहानपणी घरातील आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. पण आपल्यातील अलौकीक कौशल्यामुळे न्यूयॉर्क विद्यालयासह अन्य ६ विश्वविद्यालयाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. लतादीदींना भारत रत्न, पद्म भूषण, पद्णविभूषण, दादा साहेब फाळके अवॉर्डसह डझनभर देशी परदेशी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संगीत क्षेत्रात आज अनेक राज्यांमध्ये लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत.

- Advertisement -

लतादीदींचे खरे नाव नाव हेमा हर्डीकर होते. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मध्यप्रदेशमधील इंदौर येथे झाला. लतादीदींच्या वडिलांनी नंतर हर्डीकर आडनाव बदलून मंगेशकर केले . चित्रपटक्षेत्रात आल्यानंतर लतादीदींचे नाव लता झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली.यामुळे कुटुंबाचाची जबाबदारी लतादीदींवर आली. यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली होती. त्या घरातच अभ्यास करत होत्या. वडील दीनानाथ यांच्याबरोबर लतादीदींनी नाटकात गाणे सुरू केले होते. पण नंतर १४ व्या वर्षी त्यांनी नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

प्रेमविवाहामुळे लतादीदी आणि आशाताईंमध्ये आला दुरावा
१९४२ साली वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. तेव्हापासून कुटुंबाची सर्व जबाबदारी लतादींदीवर आली होती. पण नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारु लागली. त्यावेळी कुटुंबाच्या मनाविरुध्द लता दीदींची बहीण आशा यांनी १९४९ साली गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. याघटनेमुळे लतादीदींना धक्का बसला. त्यानंतर दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला.

- Advertisement -

३६ भाषांमध्ये गाणाऱ्या पहील्या महिला गायिका
लतादीदी देशातील सर्वात मोठ्या गायिका बनल्या होत्या. त्यांनी हिंदी भाषांमध्ये १ हजारांहून अधिक गाणी गायली. तर अन्य भाषांमध्येही लतादीदींनी गाणी गायिली होती. लतादीदींनी तब्बल ३६ भाषांमध्ये गाणे गायिले होते. यामुळे ३६ भाषांमध्ये गाणाऱ्या त्या पहील्या महिला गायिका ठरल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -