Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत अफवा, प्रकृती स्थिर

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमधून लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या अजूनही ICU मध्ये आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले आहे.

Lata Mangeshkar: Rumors about Lata Mangeshkar's health, health stable
गाणसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. लतादीदींवर मागील २७ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली असल्यामुळे लतादीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची तब्येत पुन्हा खालावल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु करण्यता आले होते. सध्या त्यांची प्रकृती खालावलेली आहे परंतु त्या उपचारांना पूर्ण प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमधून लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या अजूनही ICU मध्ये आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले आहे. याशिवाय चाहत्यांना ‘कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अफवा पसरु नका’, असे आवाहन करण्यात आले आहे.

लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट आहेत. लता मंगेशकर यांना जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 9 जानेवारीला हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट करण्यात आले होते.वयाच्या 92 व्या वर्षी त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही आजार झाला आहे. लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अपडेट देत, त्यांच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात चाहत्यांना मेगास्टारबद्दलच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अलीकडेच लता मंगेशकर यांच्य प्रकृतीबाबत अपडेट्स देत डॉक्टरांनी सांगितेल की, त्यांना 10 ते 12 दिवसात रुग्णालयात ठेवण्यात येईल, जेणेकरुन त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होऊ शकतील.

मुंबईतील रिक्षाचालक ‘सत्यवान गीते’ लता मंगेशकरांचा मोठा चाहता

देशाची गानकोकीळा लता मंगेशकर याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. मुंबईतील सत्यवान गीते गेल्या २५ वर्षांपासून ऑटो चालवत आहेत. त्यांच्या इको-फ्रेंडली ऑटो रिक्षावर लताजींची छायाचित्रे लावली आहेत. किंबहुना, लताजींच्या इतर चाहत्यांप्रमाणेच ते त्यांना सरस्वतीचे रूप मानतात. सत्यवान हा लता मंगेशकर यांचा मोठा चाहता आहे. लता मंगेशकर यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळल्या त्या दिवसापासून ते लताजींसाठी प्रार्थना करत आहे. लता मंगेशकर ह्या एक लोकप्रिय गायिका आहे ज्यांच्या नावावर अनेक भाषांमध्ये 30,000 हून अधिक गाणी आहेत. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी 1942 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.


हे ही वाचा – Priyanka Chopra : Good news! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे बनली आई