HomeमनोरंजनLata Mangeshkar : कामावर निष्ठा असावी तर अशी, गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी 8-10 तास...

Lata Mangeshkar : कामावर निष्ठा असावी तर अशी, गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी 8-10 तास उभ्या होत्या लता दीदी

Subscribe

दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी बॉलिवूड संगीत विश्वाला अनेक दर्जेदार गाणी दिली. आजही त्यांचा कर्णमधुर आवाज ऐकल्याशिवाय कित्येकांची सकाळ होत नाही. आपल्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण केली आहे. जी अन्य कुणीच घेऊ शकत नाही. भले त्या हयात नसतील पण प्रत्येकाच्या हृदयात नक्कीच आहेत. अशा भारतरत्न लता दीदींविषयी सांगावं असं बरंच काही आहे. यांपैकी एक आठवणीतला किस्सा सिनेनिर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया.

दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी बॉलिवूड संगीत विश्वाला अनेक दर्जेदार गाणी दिली. आजही त्यांचा कर्णमधुर आवाज ऐकल्याशिवाय कित्येकांची सकाळ होत नाही. आपल्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण केली आहे. जी अन्य कुणीच घेऊ शकत नाही. भले त्या हयात नसतील पण प्रत्येकाच्या हृदयात नक्कीच आहेत. अशा भारतरत्न लता दीदींविषयी सांगावं असं बरंच काही आहे. यांपैकी एक आठवणीतला किस्सा सिनेनिर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. (Lata Mangeshkar stood 8 to 10 hours for these song recording)

काय म्हणाले मेहरा?

2006 साली प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ हा सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाच्या कथानकासह यातील गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यातील ‘लुका छुपी’ हे भावनिक गाणे स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलंय. या गाण्यासंबंधित एक किस्सा फिल्मनिर्माते राकेश मेहरा यांनी सांगितला आहे.

एका नामांकित वृत्त वाहिनीशी संवाद साधतेवेळी त्यांनी सांगितले, ‘लता दीदींनी या गाण्याची ज्या पद्धतीने रिहर्सल केली त्याला काहीच तोड नाही. त्यांनी मला फोन करून या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी चेन्नईला जाऊ का? असे विचारले. मी त्यांना सांगितले की, रहमान त्यांच्या सोबत या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी मुंबईत येणार आहे. मात्र, त्यांनी चेन्नईला जाण्यावर जोर दिला. त्या म्हणाल्या, मी तिकडे गेले तर चांगलं होईल’.

रेकॉर्डिंगसाठी 8-10 तास उभ्या राहिलेल्या लता दीदी

मेहरा म्हणाले, ‘ही विनंती करतेवेळी त्या इतक्या नम्रपणे बोलत होत्या की मला नकार देता आला नाही. त्या रेकॉर्डिंगच्या तीन दिवस आधीच चेन्नईला गेल्या आणि एअरपोर्टवरून थेट स्टूडिओत पोहोचल्या. ए.आर.रहमानने त्यांचे स्वागत केले आणि गाण्याची रचना ऐकवली. लता दीदींनी रियाज करता यावा म्हणून हे गाणे कॅसेट स्वरूपात मागितले. पुढे चौथ्या दिवशी जेव्हा दीदी रेकॉर्डिंगसाठी आल्या तेव्हा गाताना पूर्णवेळ उभ्या होत्या. त्यांनी रहमानसोबत गाणे आणि जॅमिंग सुरु केले. यावेळी त्यांनी सलग 8 ते 10 तास बसण्यास नकार देत पूर्णवेळ उभे राहून गाणे रेकॉर्ड केले. कामाप्रती त्यांची श्रद्धा खरंच कौतुकास्पद होती’.

जेव्हा 2022 मध्ये गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी म्हटले होते, ‘लता मंगेशकर कुठे गेल्या? त्या कुठेही गेलेल्या नाही. माझ्या जन्माआधीदेखील त्या इथेच होत्या आणि माझ्या जाण्यानंतरही त्या अनंत काळापर्यंत इथेच राहतील. त्या कायम जिवंत राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व तुम्हाला वास्तवात अमरत्वाचा विश्वास देईल’.

हेही पहा –

Kangana Ranaut : तन्नू- मन्नू पुन्हा एकत्र, कंगना आणि मॅडीच्या नव्या सिनेमाचे शूटिंग सुरु