घरताज्या घडामोडीCorona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Subscribe

लता मंगेशकर यांचे वय जास्त असल्यामुळे काळजी घेण्यात येत आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असल्यामुळे काळजी घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढायला लागलाय. अलीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. या सेलिब्रिटींच्या यादीत आता ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश झालाय. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांना सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र वयोमानाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (वय ९२) यांना कोरोनाची लक्षण जाणवल्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांच्या घरातील सदस्यांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांचे वय जास्त असल्यामुळे काळजी घेण्यात येत आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असल्यामुळे काळजी घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

यापूर्वी नोव्हेंबर २०१९मध्ये लता मंगेशकर यांना श्वास घेण्यास अडथळा येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनक्रियेत त्रास होत असल्यामुळे लतादीदींना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हेंटिलेटवर काही दिवस ठेवल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना डिस्चार्ज दिला होता.

- Advertisement -

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. सात दशकांमध्ये लता मंगेशकर यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायले आहेत. २००१ मध्ये लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न दिले होते. तसेच १९८९ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लता मंगेशकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा : Heart Transplant from Pig : ऐतिहासिक! डुकराच्या ह्रदयावर आता जगणार माणूस, अमेरिकेत यशस्वी शस्त्रक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -