घरताज्या घडामोडीFarmer Protest : शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Subscribe

आता भारतरत्न गाणकोकिळा यांनी देखील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या कायद्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे आंदोलन चिघळताना दिसत आहे. त्यातच आता परदेशी कलाकारांनी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स आणि पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाचा विषय जागतिक पातळीवर गेला आहे. मात्र, परदेशी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याला देशातील कलाकारांनी विरोध केला आहे. हा आमच्या देशातील अंतर्गत वाद असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यातच आता भारतरत्न गाणकोकिळा यांनी देखील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या लता मंगेशकर?

शेतकरी आंदोलनाबाबत लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ‘भारत एक महान देश असून आपण सगळेच भारतीय यामुळे गौरवान्वित आहोत. त्यामुळे एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो किंवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा असो लोकांचे हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीने तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद’, असं म्हणत त्यांनी ट्विटमध्ये #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅगही दिले आहेत.

कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारत किंवा भारतीय धोरणांविरुद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे रहा’.

- Advertisement -

अर्धसत्य धोकादायक – सुनील शेट्टी

अभिनेता सुनील शेट्टीने देखील यावर भाष्य केले आहे. ‘प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहणे गरजेचे आहे. कारण अर्धसत्य हे धोकादायक असते’.

धीर धरला पाहिजे – करण जोहर

शेतकरी आंदोलनावर करण जोहरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपण कठिण काळात जगत आहोत. त्यामुळे एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. पण, धीर धरला पाहिजे’.

मतभेद निर्माण करु नका – अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारने देखील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेतकरी हा आपला देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याकरता मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा’.


हेही वाचा – Rihanna च्या ट्वीटवर आता अमित शाह यांचं ट्वीट! नेमका काय आहे वाद?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -