घरमनोरंजनलता दीदींवर अज्ञात व्यक्तीने केला होता विषप्रयोग

लता दीदींवर अज्ञात व्यक्तीने केला होता विषप्रयोग

Subscribe

1963 साली लता दीदी जेव्हा 33 वर्षांच्या होत्या त्यावेळी कोणीतरी त्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.

गाणकोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतातील सामान्य नागरिकांपासून ते दिग्गज कसकारांपर्यंत अनेक हळहळ व्यक्त केली होती. आजही त्यांच्या आठवणींना अनेकजण उजाळा देत असतात. आजही त्यांच्या आवाजाती सुमधूर गाणी चाहते आवडीने ऐकतात.

Did you know, Lata Mangeshkar was given a slow poison years ago?

- Advertisement -

लता दीदींनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये जवळपास 36 भाषांमध्ये 50,000 पेक्षा जास्त गाणी गायली होती. लता दीदींनी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवला शिवाय त्यांनी अनेक मोठमोठे पुरस्कार देखील प्राप्त केले. एका पेक्षा एक गाणी गाणाऱ्या लता दीदींना त्यांच्या करिअरमध्ये एक कठीण परिस्थितीचा सामना देखील करावा लागला होता. ज्याबाबत लता दीदींनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.

वयाच्या 33 व्या विष देऊन मारण्याचा प्रयत्न

- Advertisement -

When Lata Mangeshkar was given a slow poison1963 साली लता दीदी जेव्हा 33 वर्षांच्या होत्या त्यावेळी कोणीतरी त्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा करत सांगितलं होत की, “त्यावेळी मी बेडवरुन उठू शकत नाही आणि हे सर्व जवळपास तीन महिने सुरु होतं. माझं कुटुंब याबाबत काहीही सांगू इच्छित नव्हता कारण या माझ्यासाठी खूप दुःखद प्रसंग होता.” लता दीदी म्हणाल्या की, त्यांना कोणीतरी विष देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही.

 


हेही वाचा :

पहिल्या स्मृती दिनानिमित्त “लतांजली”; राखी, हेमा मालिनीसह अनेकजण राहणार उपस्थित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -