‘या’ पोस्टमुळे अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या विळख्यात

छोट्या पडद्यावरीव अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) सोशल मिडीयावर तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण आता श्वेता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा श्वेताला तिच्या सोशल मीडियाच्या पोस्ट वरून ट्रोल केलं आहे. श्वेताने तिच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्याच्यासोबत फोटो शेअर केला होता. श्वेताच्या या मित्राचे नाव विकास कलंत्री (Vikaas Kalantri)आहे. श्वेताने विकाससोबत जुने फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

फोटो शेअर करत भावूक होऊन श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिलं,’जेव्हा मला बोलावसं वाटतं तू ऐकतोस…जेव्हा मला वाट चुकल्यासारख वाटतं तेव्हा तू मला मार्गदर्शन करतोस… जेव्हा मी कोणत्या संभ्रमात असते त्यावेळी तू माझा आत्मविश्वास वाढवतोस… जेव्हा मला एखाद्यावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकायचं होतं तेव्हा तू ते सिध्द करून दाखवलं की मी ते करू शकते. आणि याच कारणामुळे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या या गोड मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा खास कॅप्शन श्वेताने लिहिला होता.

याआधी श्वेताने एक नाही तर दोन लग्नं केली आहेत. मात्र दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. तेव्हापासून श्वेता सतत चर्चेत राहते.