Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन गर्ल्सची रोड ट्रीप 'जी ले जरा' या चित्रपटाचे पोस्टर प्रर्दशित

गर्ल्सची रोड ट्रीप ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रर्दशित

Related Story

- Advertisement -

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबीद्वारा निर्मित, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ चा प्रवास पुढच्या वर्षी सुरु होणार आहे. प्रियांका चोप्रा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ नंतर पुढचा रोड ट्रिप चित्रपट सादर करण्याची जबाबदारी प्रियांका चोप्रा, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यावर असणार आहे. टायगर बेबीच्या सहयोगाने निर्मित होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘जी ले जरा’ आहे.

- Advertisement -

या सोबतच, निर्मात्यांनी ही २०२१ साठीची सर्वात धमाकेदार घोषणा केली असून, याचे लेखन जोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी केले असून रीमा कागती, जोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची निर्मित आहे. या चित्रपटाबाबतची आणखी एक खास गोष्ट ही आहे की याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

खरोखरच, दोन दशकांनंतर ‘जी ले जरा’ ची ही घोषणा, टाइगर बेबीच्या सहयोगाने एक्सेल एंटरटेनमेंटसाठी एका माइलस्टोनचे यश साजरे करण्याचा सर्वात रोमांचक भाग आहे, कारण आणखी एका रोड ट्रिपची लोकप्रिय मागणी आता पूर्ण होणार आहे.

- Advertisement -