HomeमनोरंजनSaif Ali Khan : खरंच हल्ला झाला की सैफ ॲक्टिंग करतोय? विचारणाऱ्यांसाठी...

Saif Ali Khan : खरंच हल्ला झाला की सैफ ॲक्टिंग करतोय? विचारणाऱ्यांसाठी डॉक्टरने केलं ट्विट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मंगळवारी 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला झाला. चोरीच्या निमित्ताने घरात घुसलेल्या अज्ञाताने अभिनेत्यावर चाकूने एकूण 6 वार केले होते. ज्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. हल्ल्यानंतर 5 दिवसांनी 21 जानेवारी रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यावेळी घरी परतताना तो अगदी धडधाकट, काहीही न झाल्यासारखा चालताना दिसला. भले त्याच्या हातावर आणि मानेवर पट्टी दिसत होती. पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. त्यामुळे अभिनेत्याचा डिस्चार्जनंतर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी तर्क वितर्क लावले, संशय व्यक्त केला. अखेर यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

खोल वार, 6 तासाचे ऑपरेशन

हल्यानंतर गंभीर अवस्थेत सैफवर लीलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल 6 तास सुरु होती. त्याच्या मणक्याजवळ 2.5 इंचाचा चाकू रुतलेला होता. जो डॉक्टरांनी काढला. इतक्या गंभीर जखमा असताना सैफ अवघ्या 5 दिवसात ठणठणीत कसा झाला? डिस्चार्जनंतर तो इतका फिट कसा काय दिसू शकतो? याविषयी अनेकांनी संशय व्यक्त केला. संजय निरुपम आणि नितेश राणे यांसारख्या नेत्यांनीदेखील यावर सवाल केले. अखेर याविषयी बेंगळुरूमधील एका कार्डिओलॉजिस्टने उत्तर दिलं आहे.


काय म्हणाले डॉक्टर?

बेंगळुरूतील कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय, ‘ज्या लोकांना (विनोदाचा भाग म्हणजे काही डॉक्टरांनासुद्धा) सैफच्या मणक्याच्या सर्जरीबद्दल शंका वाटतेय, हा व्हिडीओ मी त्या सगळ्यांसाठी पोस्ट करतोय. माझ्या 78 वर्षीय आईची 2022 साली मणक्याची सर्जरी झाली होती. तेव्हा तिच्या एका पायालाही फ्रॅक्चर होतं. कमी वयातील कोणताही फिट व्यक्ती यापेक्षा जलद बरा होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना सैफच्या रिकव्हरीबाबत शंका आहे, त्यांनी एकदा व्यवस्थित माहिती घ्यावी’.

 

 

 

हेही पाहा –