घरमनोरंजनमशीन आणि माणसाच्या नात्याचं दर्शन

मशीन आणि माणसाच्या नात्याचं दर्शन

Subscribe

आगामी 'लेथ जोशी' या चित्रपटात कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मशीन आणि माणसाचे नाते दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला “लेथ जोशी” हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचं प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. या गाण्यातून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाची ओळख होणार आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्यजित शोभा श्रीराम यांनी सिनेमॅटोग्राफी तर मकरंद डंभारे यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे. कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं करणारे ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर हे या सिनेमात भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे नातं आहे मशीन आणि माणसामधलं

“एक मशीन बाहेर आणि एक मशीन आत, आत आणि बाहेर नुसताच खडखटाट…” अशा ओळी असलेलं गाणं खूपच स्पेशल आहे. माणसाचं जगणं आणि मशीन यांच्यातलं नातं हे गीत नेमकेपणानं अधोरेखित करतं. वैभव जोशी यांनी लिहिलेलं गीत नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. जयदीप वैद्य या नव्या दमाच्या गायकानं हे गीत गायलं आहे. साधेसोपे शब्द, उत्तम चित्रीकरण आणि गुणगुणावीशी वाटणारी चाल यामुळे हे गाणं नक्कीच चित्रपटप्रेमींच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे तर अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केली आहे.तर प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -