Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शूटींगसाठी मुंबई सोडली, गोव्यातही आता लॉकडाऊन अन् हिंदी मालिकांचे शूटिंग पुन्हा ठप्प

शूटींगसाठी मुंबई सोडली, गोव्यातही आता लॉकडाऊन अन् हिंदी मालिकांचे शूटिंग पुन्हा ठप्प

चित्रीकरणासाठी बंगला भाड्याने घेतला आहे. आजपासून मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीवर होणार आहे कारण येथे बहुतेक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत. अत्यंत बिकट परिस्थिती जागोजागी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. तसेच रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक लॉक डाऊन लागू केलं आहे. अशातच चित्रपट,मालिकांच्या चित्रिकरणास सुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये तसेच चित्रिकरण सुरळीत चालू राहावे यासाठी अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला. आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सपूर्ण गोवा राज्यात 29 एप्रिल पासून ते 3 मे पर्यन्त कडक लॉक डाऊन लावण्यत आला आहे.अद्याप चित्रीकरण सुरू ठेवण्याबाबत गोवा सरकार तर्फे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये यामुळे चित्रीकरणा साठी गोवा मध्ये गेलेल्या अनेक मालिकांच्या निर्मात्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.

गोव्यामध्ये अनेक हिंदी मालिकांचे चित्रीकरण काही दिवसांपासून सुरू होते यामध्ये कुमकुम भाग्य, गुम है किसी के प्यार में, आपकी नजरों ने समझा, शौर्य और अनोखी की कहानी, ये है चाहतें, कुंडली भाग्य, अपना टाइम भी आएगा, तुझसे है राब्ता, कुर्बा या मालिकांनी चित्रीकरण गोव्यात करण्याचा निर्णय घेतला होता.
‘गुम है किसी की प्यार में’ मालिकेच्या निर्माते प्रदीप कुमार यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, ‘नुकतच उत्तर गोव्याच्या बहुतांश भागांवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही दक्षिण गोव्यात राहत आहोत.तसेच चित्रीकरणासाठी बंगला भाड्याने घेतला आहे. आजपासून मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीवर होणार आहे कारण येथे बहुतेक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे. आम्ही आता या समस्येच्या निवारणासाठी विचार करत आहोत” असे निर्मात्यांतर्फे सांगण्यात आले आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – माझ्या देशातील लोकं मरत आहेत म्हणत, प्रियांका – निक उतरले कोरोनाविरोधी लढ्यात

- Advertisement -