Lata Mangeshkar Health Update: अजूनही लता मंगेशकर ICUमध्ये; आणखीन किती दिवस देखरेखीखाली राहावे लागणार, डॉक्टरांनी सांगितले

नोव्हेंबर २०१९पासून लता मंगेशकर घराबाहेर पडल्या नाहीत, तरी त्यांना कोरोनाने गाठलं.

lata mangeshkar health update today Lata Mangeshkar still in ICU doctors share health update
Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी ११ जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पहिल्यापेक्षा चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यामुळे लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्यसंदर्भातील अपडेट देताना डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया दोन्ही झाला आहे. त्यांच्या वयोमानाचा विचार करता डॉक्टरांनी सल्ला दिला की, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यांना त्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आता लता मंगेशकर यांना आणखीन ७ ते ८ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

नोव्हेंबर २०१९पासून लता मंगेशकर घराच्या बाहेर पडल्या नाहीत

माहितीनुसार, लता मंगेशकर नोव्हेंबर २०१९पासून घरातून बाहेर पडल्या नाहीत. परंतु त्यांच्या घरातील एका नोकरचा कोरोना अहवाला पॉझिटिव्ह आला. त्यामुळे लता मंगेशकर यांची चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी लता मंगेशकर यांना नोव्हेंबर २०१९मध्येच श्वास घेण्याचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सात दशकातील कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी विविध भाषांमधील ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. २००१मध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजे भारतरत्नने लता मंगेशकर यांना गौरविण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.


हेही वाचा – ‘त्याला सांभाळणं कठीण झालं होतं’, Samantha – Naga Chaitanyaच्या घटस्फोटानंतर वडील नागार्जुन यांची प्रतिक्रीया