अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रात शूटिंग सुरू ठेवण्यास मागितली परवानगी

बॉलिवूड महराष्ट्राबाहेर हलवण्याचे षडयंत्र असून आपण त्यापासून सावध राहणे अत्यावश्यक आहे

Letter from the All India Marathi Film Corporation to the Chief Minister, asking permission to continue shooting in Maharashtra
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रात शूटिंग सुरू ठेवण्यास मागितली परवानगी

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोना व्हायरस दाखल होऊन वर्ष पालटले आहे. तरीसुद्धा याचा प्रसार झपाटयाने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. यामुळे ठाकरे सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्त्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यातआली आहे. अशातच पुन्हा एकदा लोकांची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. याचे पडसाद आता चित्रपटसृष्टीवरही पडू लागले आहेत. लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे अनेक मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले आहेत. सध्या आयपीएल चे सामने सुरू असल्यामुळे प्रेक्षकवर्ग तिकडे आकर्षित होऊ नये तसेच आर्थिक नुकसानीला पुन्हा तोंड द्यावे लागू नये यासाठी अनेक मालिकांनी आपले चित्रीकरण परराज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच आता ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने’ चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी पत्र लिहलं आहे.पत्रामध्ये अधिकाधिक निर्बंध लावून का होईना पण शूटिंग चालू ठेवण्यास परवानगी द्या अशी विनंती करण्यात आली आहे. इतकेच नाही तर बॉलिवूड महराष्ट्राबाहेर हलवण्याचे षडयंत्र असून आपण त्यापासून सावध राहणे अत्यावश्यक आहे असे बोलण्यात आले आहे.

तसेच पत्रामध्ये पुढे लिहले आहे की कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी तुम्ही ब्रेक द चेन मोहीम अंतर्गत लॉक डाऊन घोषित केला आणि त्यांनातर आपण सर्वच प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक दिला. हिंदी चॅनल ने आपले शूटिंग महराष्ट्राबाहेर हालवले आहे.मनोरंजन इंडस्ट्री आपल्याकडे यावी म्हणून अनेक राज्यांनी रेड कारपेट अंथरली आहेत. आज लॉक डाऊनचा आधार घेऊन महाराष्ट्राबाहेर शूटिंग व्यवस्थित आणि योग्य बजेट मध्ये पार पडली जाऊ लगली तर ही इंडस्ट्री महाराष्ट्राबाहेर जायला वेळ लागणार नाही. बॉलिवूड इंडस्ट्री ही महराष्ट्राची शान आहे. या इंडस्ट्री वर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील लाखो कलाकार,तंत्र,कामगारबेकार होतील काही हजार कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असणार्‍या इंडस्ट्री मधून मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो. योग्य खबरदारी घेऊन चित्रीकरण पार पाडू अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.


हे हि वाचा – मराठी मालिकांचेही चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे चित्रिकरण राज्याबाहेर होणार