Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेवर LGBTQIA+ कम्युनिटीने घेतला आक्षेप

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेवर LGBTQIA+ कम्युनिटीने घेतला आक्षेप

स्पर्धेमध्ये एक स्पर्धक ‘सँडी’ हा समलैंगिक असल्याचे दाखवण्यात आले आहे. सँडी या पात्राची भूमिका अभिनेता अजिंक्य पितळेने साकारली आहे.

Related Story

- Advertisement -

स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेतील दाखवण्यात आलेल्या एका दृश्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही मालिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मात्र मालिकेत चित्रित करण्यात आलेल्या एका सीनमुळे  मालिका चांगलीच अडचणीत सापडली आहे.‘फुलाला सुगंध मातीचा’ अभिनेता हर्षद अतकरी मुख्य भूमिकेत झळकत असून तो शुभमची या पात्राची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत शुभमने एका पाककला स्पर्धेत भाग घेतला आहे असे दाखवण्यात येत आहे. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब त्या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले आहे. याच स्पर्धेमध्ये एक स्पर्धक ‘सँडी’ हा समलैंगिक असल्याचे दाखवण्यात आले आहे. सँडी या पात्राची भूमिका अभिनेता अजिंक्य पितळेने साकारली आहे. स्पर्धा सुरु असताना सँडी आणि शुभमची आई म्हणजेच जीजी अक्का यांच्यामध्ये झालेल्या संभाषणामुळे LGBTQIA+ कम्युनिटीने निषेध व्यक्त करत आक्षेप नोंदवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yes, We Exist (@yesweexistindia)

- Advertisement -

स्पर्धा सुरु असताना जीजी अक्का सँडीला अनेक गोष्टींबद्दल बोलत आहेत . जीजी अक्का सँडीला सर्व ज्वेलरी म्हणजेच गळ्यातले, बांगड्या बहिण किंवा आईला देऊन टाक असे सांगते. तसेच त्याला जीममध्ये जाण्यास सांगते. आणि याच दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘Yes, we exist india’ या इन्स्टाग्राम अकाऊंट वरील पेजने याबाबत माहिती देत पोस्ट शेअर केली आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमध्ये दाखवण्यात आलेली अतिशय लोकप्रिय मालिक ‘दिया और बाती हम’चा मराठीमध्ये  रिमेक करण्यात आला आहे. या मालिकेत हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.


- Advertisement -

हे हि वाचा – हसीन दिलरुबा’सिनेमाचा टीजर रिलीज,तापसी पन्नू दिसणार बोल्ड अंदाजात

- Advertisement -