HomeमनोरंजनMithila Palkar : एका कप सॉंगमुळे रातोरात स्टार झालेली मिथिला पालकर

Mithila Palkar : एका कप सॉंगमुळे रातोरात स्टार झालेली मिथिला पालकर

Subscribe

मिथिला पालकर ही मराठमोळी अभिनेत्री आहे. कुरळे केस, मोठे डोळे, सडसडीत बांधा आणि दिलखुलास हास्य असणाऱ्या मिथिलाने आजपर्यत अनेक चित्रपट, नाटके आणि वेबसिरीज केल्या आहेत. केवळ मराठी, हिंदीच नाही तर साउथ इंडस्ट्रीतही मिथिलाने काम केलं आहे. एका रात्रीत स्टार होणे याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मिथिला पालकर हे उत्तम उदाहरण राहील. मिथिला स्टार तिच्या कप सॉंगमुळे स्टार झाली. मिथिलाने ही चाल तुरु तुरु हे क्लासिक मराठी गाणे गाऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हे गाणं एका रात्रीत इतके हिट झाले की, सामान्य घरातली मुलगी रातोरात स्टार झाली. चला तर मग जाणून घेऊयात, व्हायरल कप सॉंग गर्ल मिथिलाविषयी…

मिथिलाचा जन्म एका मराठी कुटूंबात 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईतील वसई येथे झाला आहे. मिथिलाचे शालेय शिक्षण IES च्या मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर येथून झाले आहे. पुढचं शिक्षण श्रीमती एमएमके कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकोनॉमिक्स, मुंबई येथुन केले. पदवी मिळाल्यानंतर ती लॉस एंजेलिसला गेली आणि तिथे तिने अभिनयाचे धडे गिरविले. 2014मध्ये मिथिलाने अभिनयाचे शिक्षण घेऊन भारतात परतली आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देऊ लागली. मिथिला ही कथ्थक डान्सर सुद्धा आहे.

मिथिलाचा Confusing Things Girl Say नावाचा एक युट्युब व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला. यानंतर 2014 मध्ये Majha Honeymoon शॉर्ट फिल्ममधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. 2015 मध्ये कट्टी बट्टी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 2016 मध्ये मिथिलाला Girl In The City या युट्यूब वेब सिरीजमधून खूप लोकप्रियता मिळाली. या सिरीजनंतर Littile Things या आणखी एका वेब सिरीजमध्ये कास्ट करण्यात आले. यानंतर काही वर्षातच तिने मराठी मुरांबा हा सिनेमा केला. तिची मुरांबामधील इंदू ची भुमिका चांगलीच गाजली होती. यानंतर तिने चॉपस्टिक्स सारखे सिनेमे pretty fit सारख्या सिरीज आणि वेब सिरीज केल्या आहेत.

 

 

 

 

हेही पाहा –