Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन इतरांप्रमाणे माझ्यात दिखावूपणा नाही... श्रुती हासनने सांगितलं इंडस्ट्रीमधील सत्य

इतरांप्रमाणे माझ्यात दिखावूपणा नाही… श्रुती हासनने सांगितलं इंडस्ट्रीमधील सत्य

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री श्रुती हासन अनेकदा तिचं मत मोकळेपणाने मांडत असते. अनेकदा श्रुतिने इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या भेदभावांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत श्रुतीने याबाबत पुन्हा आपलं मत मांडलं आहे.

श्रुतीने सांगितला बॉलिवूडमधील भेदभाव
श्रुती म्हणाली की, तुम्हाला ज्या कामाची सुरुवात करायची असते त्याचा तुम्ही चांगलाच विचार करता. काही लोक तुमच्या त्या कामाला पसंती देतात. तर काहीजण नापसंती देतात. प्रत्येक चित्रपट तुम्ही चांगलाच करण्याचा प्रयत्न करत असता. प्रत्येक चित्रपटातून तुम्हाला काहीतरी शिकायला देखील मिळतं. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलण्यात आल्या. परंतु आता तेच माझ्याबद्दल चांगलं बोलतात. त्यासाठी मी त्या लोकांचे आभार मानते. माझा बॉलिवूडचा एक चांगला प्रवास घडला. मला फरक नाही पडत की लोग माझ्याबद्दल काय बोलतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

- Advertisement -

“माझ्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. मला कश्या प्रकारचे कपडे वापरायला हवे, कशा प्रकारे बोलायला हवं, सगळ्या गोष्टी मला सांगण्यात आल्या. शिवाय मला सांगण्यात आलं की, मी ज्या प्रकारे बोलते ते लोकांना समजत नाही. परंतु मी खऱ्या आयुष्यात देखील तशीच होते. माझ्यामध्ये कोणताच दिखावूपणा नाही. मला असंच खरं राहायला आवडतं.”

श्रुती आता हॉलिवूडमध्ये झळकणार
सध्या श्रुती हासन हॉलिवूडमधील द आई या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त श्रुती प्रभाससोबत एका चित्रपटात दिसणार आहे. शिवाय ती वीर सिम्हा रेड्डी आणि चिरंजीवी यांच्या चित्रपटांमध्ये देखील आगामी काळात दिसेल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शीजानला भेटल्यापासून तुनिषा वापरू लागली हिजाब; तुनिषाच्या काकांचा दावा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -