घरमनोरंजनकंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? उच्च न्यायालयाचा 25 जूनला निर्णय

कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? उच्च न्यायालयाचा 25 जूनला निर्णय

Subscribe

कंगानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक लागण्याची किंवा त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या हजर जवाबीपणामुळे तिला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा कंगनाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. काहि दिवसांपुर्वी कंगनाने केलेला देशद्रोहाचा आरोपामुळे ती पुरती फसली अल्याचे दिसतेय. कंगनावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरु असल्याने कंगनाच्या पासपोर्ट नुतणीकरणास प्राधिकरणाने नकार दिला आहे. (Authority refuses to renew Kangana Ranaut’s passport due to treason charges) देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक लागण्याची किंवा त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूची मागणी करत कंगनाने पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. (kangana moves bobmbay high court to renew passport)बॉम्बे हायकोर्टाने कंगनाच्या याचिकेवर सुनावनी देत म्हंटले आहे की, अभिनेत्रीने चुकीची याचिका दाखल केली आहे.जर पासपोर्टची तारिख कालबाह्य होत आहे तर शेवटच्या क्षणी याचिका दाखल का केली ? यानंतर बॉम्बे हायकोर्टाने कंगनाला पुन्हा नविन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावनी 25 जूननंतर होणार असल्याचा निर्णय दिला आहे

पासपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनावर आक्षेपार्य ट्विट आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये खटला सुरु आहे. त्यामुळे कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करता येणार नाही. मात्र कंगनाने शांत न बसता बॉम्बे हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. देशद्रोहाच्या खटल्याखाली उच्च न्यायालयाने कंगनाला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कंगनाची बहिण रंगोली हिचा देखील समावेश आहे.कंगनाच्या पासपोर्टची शेवटची मुदत ही सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. कंगनाच्या आगामी प्रोजेक्टसाठी तिला एका आंतराराष्टीय दौऱ्यावर जायचे आहे. तिच्या पुढील सिनेमात तिला मुख्य भुमिका मिळाली आहे. त्या सिनेमाच्या शुटींगसाठी कंगनाला बुडापेस्टला जायचे आहे. त्यामुळे तिला तिचा पासपोर्ट रिन्यू करायचा असल्याचे कंगनाने म्हटले आहे. देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगनाचा आंतरराष्ट्रीय प्रवासावर बॉम्बे हायकोर्ट काय निर्णय देणार हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – नीना गुप्ता स्वतःच्या लग्नाची शॉपिंग करत होती अन् शेवटच्या क्षणी समोरून आला नकार !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -