सध्या संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे लागून राहिलेले आहे. शिवसेना नेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या परिस्थितीबाबत राजकीय क्षेत्रासोबतच सिनेसृष्टीतील कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. त्यात सुमित राघवन, किरण माने, हेमंत ढोमे यांच्यासारख्या बऱ्याच कलाकारांनी आपले मत व्यक्त केले.
दरम्यान या सगळ्यात अभिनेता शिव ठाकरेची सुद्धा भर पडली आहे. ‘मराठी बिग बॉस २’ चा विजेता शिव ठाकरेने याचं संदर्भात त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल झाली आहे. दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव द्वारे भाषण केले होते. हे भाषण ऐकून अनेकजण खूप भावूक झाले. यावेळी शिव ठाकरेची आई सुद्धा खूप भावूक झाली होती. शिव ठाकरेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची आई उद्धव ठाकरेंची भाषण ऐकून खूप भावूक झालेली दिसत आहे.
शिव ठाकरेने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच व्हिडीओमध्ये त्याने एक कॅप्शन सुद्धा दिलेले आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “माझी भावूक आई, खऱ्या माणसांसाठी खरी माणसं भावूक होतात.जय महाराष्ट्र” असं त्याने म्हणटले आहे.
View this post on Instagram
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. येत्या काळात हे बंडखोर आमदार नक्की कोणती भूमिका घेतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.