Lock upp : तेजस्वी प्रकाशने केली कंगना रनौतच्या ‘लॉकअप’मध्ये एन्ट्री

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा रियालिटी शो ‘लॉकअप’ आता ग्रँड फिनालेच्या दिशेने जात आहे. जसजसा या कार्यक्रमाचा फिनाले जवळ येत आहे, तस तासा यामध्ये अनेक धमाकेदार घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पूनम पांडे या शोमधून बाहेर पडली. आता प्रेक्षकांना या रियालिटी शोची ट्रॉफी नक्की कोणाच्या हातामध्ये जातेय, हे पाहण्यची उत्सुकता लागून राहिलेली आहे. पण आता अशातच यामध्ये एक नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे या शोमध्ये आता बिग बॉस १५ ची विजेतीची एन्ट्री होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

लॉकअपच्या नव्या प्रोमोमध्ये हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश दिसून येत आहे. प्रोमोद्वारे खुलासा करण्यात आला आहे की ती, लॉकअपमध्ये वार्डन म्हणून एन्ट्री घेणार आहे. यामुळेच प्रेक्षकांना आता या शोमध्ये नक्की काय घडणार असल्याची उत्सुकता लागली आहे. या प्रोमोमध्ये तेजस्वीने खूप स्डाइलिश अंदाजात एन्ट्री घेतली आहे. त्याबरोबरच ती एक-एक करून जेलमधील प्रत्येक कैद्याचं नाव घेते आणि आता कुणावर विषारी वार होणार? असं म्हणत आहे. या प्रोमोवरून लक्षात येत आहे की, तेजस्वीच्या येण्याने आता नक्कीच एक स्पर्धक बाहेर पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Dhaakad (@kanganaranaut)

या कार्यक्रमाशिवाय कंगना रनौतचा धाकड हा आगामी चित्रपट सुद्धा चांगलाच चर्चेत आहे. कंगनाचा हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

 


हेहीू वाचा :तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर निर्मीत ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला