Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Lockdown - मयूर वैद्य रमलाय 'कथ्थक' रियाजात!

Lockdown – मयूर वैद्य रमलाय ‘कथ्थक’ रियाजात!

Subscribe

'कुठल्याही गोष्टीत निपुण होण्यासाठी, रियाज अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यायला हवी' असा संदेश सुद्धा त्याने या व्हीडिओमध्ये दिला आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सारीच मंडळी लॉकडाऊनमध्ये आहेत. या लॉकडाऊनचा चांगला वापर करून घेण्याचा प्रयत्न अनेक सेलिब्रिटी मंडळी सुद्धा करत आहेत. आपले छंद जोपासण्यासाठी काहींनी किचनचा तर, काही मंडळींनी घरातील जिम आणि योगा यांचा मार्ग निवडला आहे. मयूर वैद्य मात्र याला काही प्रमाणात अपवाद आहे. छंद आणि फिटनेस यांचा योग्य मेळ साधत, तो नृत्याचा रियाज करत असल्याचे लक्षात आले आहे.

View this post on Instagram

घुंगरू व कथक चे अनन्यसाधारण नातं आपल्या समोर मांडण्याचा या विडिओ च्या मार्गाने प्रयत्न, ?? Lockdown मध्ये रोजच घुंगरू बांधून रियाज सुरू असतो आणि नाही केला तर नक्कीच काहीतरी हरवल्यासारख वाटत! #mayurvaidya #mayurvaidyaarttemple #ghungroo #kathak #kathakdance #kathakfusion #love #riyaz #practiceeveryday #daily #dailyinspiration #instagood #instadaily #instadance #instadancers #dancersofig #marathi #marathiinspirations #celebrity #cele #pune #guru #exponential #dancing #sunday #sunnyday#selfquarantine #lockdown #goodmorning

A post shared by Mayur Vaidya (@_mayur_vaidya_) on

- Advertisement -

मयूर वैद्य आणि कथ्थक, हे समीकरण सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेच्या निमित्ताने मयूर परीक्षक म्हणून घराघरात पोचला. सर्व स्पर्धकांप्रमाणेच मयूर सुद्धा प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. त्यामुळेच, लॉकडाऊनच्या काळात मयूर काय करतो, हे जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांना आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मयूर त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेच.

View this post on Instagram

पग मे घुंगर बांध के! ❤️ कोणत्याही कलेमध्ये कौशल्य मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "रियाज", कितीही संकट आली तरी रियाज सुरू ठेवा, मी माझा रियाज रोजच्या रोज करतोय, तुम्ही करताय की नाही? #mayurvaidya #mayurvaidyaarttemple #riyaz #fromhome #athome #practice #practicemakesperfect #ghungroo #riyazlovers #dancelife #rehearsal #kathak #kathakdance #home #practicing #daily #motivated #pune #mumbai #maharashtra #dancewear #dancerlife #celebrity #marathi #lovefordance #practiceeveryday #dailyinspiration #goodafternoon

A post shared by Mayur Vaidya (@_mayur_vaidya_) on

- Advertisement -

कथ्थकचा रियाज करत असतानाचा त्याचा व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या नृत्यातील साज, चाहत्यांसह सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कुठल्याही गोष्टीत निपुण होण्यासाठी, रियाज अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यायला हवी’ असा संदेश सुद्धा त्याने या व्हीडिओमध्ये दिला आहे. कथ्थकमधील विश्वरत्न असूनही, अधिकाधिक निष्णात होण्यासाठी नियमित रियाज करत असलेल्या मयूरचे खूप कौतुक होत आहे.


हे ही वाचा – Video – …आणि कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच सुरू केला व्यायाम!


 

- Advertisment -