घरCORONA UPDATEलॉकडाऊन लग्न! अरुण गवळींची मुलगी मराठी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ!

लॉकडाऊन लग्न! अरुण गवळींची मुलगी मराठी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ!

Subscribe

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळी उद्या विवाहबद्ध होणार आहे. योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे लॉकडाऊनचे नियम पाळत लग्न करणार आहे. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असेल. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.

- Advertisement -

लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं.

View this post on Instagram

❤️

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

- Advertisement -

कोण आहे अभिनेता अक्षय वाघमारे?

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.


हे ही वाचा – जेवण वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीस प्रशासनाचा नकार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -