घरताज्या घडामोडीचित्रपट नाही तर 'हा' व्हिडिओ लाँच करून भाईजान देणार ईदी!

चित्रपट नाही तर ‘हा’ व्हिडिओ लाँच करून भाईजान देणार ईदी!

Subscribe

व्हिडिओ लॉन्च करून सलमान चाहत्यांना ईदी देणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. २०१० पासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षी देखील सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना खूश करण्यासाठी नवा म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये सलमानने स्वत:चं युट्यूब चॅनल लॉन्च केलं आहे. या आधी याच चॅनलच माध्यमातून त्याने प्यार कोरोना, तेरे बीन ही गाणी लॉन्च केली. या दोन्ही गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या लॉकडाऊनमध्ये सलमान आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. त्यामुळे या वर्षी चित्रपट नसला तरी व्हिडिओ लॉन्च करून सलमान चाहत्यांना ईदी देणार आहे.

- Advertisement -

२०१० पासून सलमान ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करत आहे. २०१० मध्ये सलमानचा ‘दबंग’ ईदला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली होती. त्यानंतर २०११मध्ये ‘बॉडीगार्ड’, २०१२मध्ये ‘एक था टायगर’, २०१४मध्ये ‘किक’, २०१५मध्ये ‘बजरंगी भाईजान’, २०१६मध्ये ‘सुलतान’, २०१७मध्ये ‘ट्यूबलाईट’, २०१८मध्ये ‘रेस ३’ आणि २०१९मध्ये ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती.


हे ही वाचा – सेक्रेड गेम्स मधील गायतोंडेच्या वडिलांची भुमिका साकारणाऱ्या धुमाळ काकांचे निधन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -