घरट्रेंडिंगVideo - इरफानचा मुलगा बाबीलने शेअर केला व्हीडिओ, चाहत्यांच्या डोळ्यात आलं पाणी!

Video – इरफानचा मुलगा बाबीलने शेअर केला व्हीडिओ, चाहत्यांच्या डोळ्यात आलं पाणी!

Subscribe

नुकताच इरफान खानचा मुलगा बाबिल याने सोशल मीडियावर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ बघताना पुन्हा एकदा इरफानच्या आठवणी ताज्या होतात.

अभिनेता इरफान खानचं असं अचानक जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलं. अजूनही तो आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. इरफान खान आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही. त्याचा अभिनय बघण्याची संधी पुन्हा मिळणार नाही ही कल्पनाच सहन होण्यापलीकडची आहे. आज भारतातील प्रत्येकजण त्याचे जूने व्हीडिओ, फोटो पोस्ट करून त्याला श्रध्दांजली वहात आहे. नुकताच इरफान खानचा मुलगा बाबिल याने सोशल मीडियावर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ बघताना पुन्हा एकदा इरफानच्या आठवणी ताज्या होतात.

- Advertisement -

बाबिलने इरफानचा एक जूना व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत इरफान पाणी पुरी खाताना दिसत आहे. इरफान एका हॉटेलमध्ये पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. ‘जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि शूट संपल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाता..’ असं कॅप्शन बाबीलने हा व्हीडिओ पोस्ट करताना दिलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

Tb

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

- Advertisement -

दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झाले आहे. २०११मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा सुरू होता. त्याचसाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच २५ एप्रिल रोजी त्यांच्या आईचे देखील निधन झाले होते. मात्र, करोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यांचे अंतिम दर्शन घेतले होते. मात्र, आता खुद्द इरफान खान यांच्याच निधनाच्या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीवर दु:खाची शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू अभिनेता हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या हिंदी मीडियम या चित्रपटाचा तो सिक्वेल होता. त्यांच्या मकबूल, पीकू, द लंच बॉक्स, हिंदी मीडियम अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची छाप त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर सोडली होती.


हे ही वाचा – सामान्य चेहर्‍याचा असामान्य कलाकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -