घरमनोरंजन'लॉकडाऊन लग्न'मध्ये ‘हे’कलाकार दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत!

‘लॉकडाऊन लग्न’मध्ये ‘हे’कलाकार दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत!

Subscribe

गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘लॉकडाऊन लग्न’ येत्या 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

चित्रपटात हे कलाकार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

या चित्रपटात आता अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘लॉकडाऊन लग्न’ या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली आहे. रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते, त़्या दरम्यान काय धमाल होते याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

चित्रपटाची स्टारकास्ट

अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके,प्राजक्ता गायकवाड,अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.

मास्क, सँनिटायझर अन् बरचं काही

‘लॉकडाऊन लग्न’ सिनेमाच्या पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या चित्रपटानी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. ‘लॉकडाऊन लग्न’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

- Advertisement -

प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी बलोच, सरसेनापती बंबीरराव अशा सुपरहिट सिनेमांत प्रवीण तरडेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. आता प्रवीण तरडेंच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -