मानेवर Love Bite गालावर किस, Jacqueline – Sukeshचा नवीन फोटो लीक

'मी सध्या फार वाईट काळातून जात आहे. मला आशा वाटते की माझे सर्व मित्र मैत्रीणी मला यातून बाहेर काढतील. माझ्या सोशल मीडिया फॅमिलीतील सर्वांना माझी एकच विनंती आहे की, माझ्या प्रायव्हसीची काळजी घ्या'

Love Bite on the neck Jacqueline fernandez Sukesh chandrashekhar new photo leaked
मानेवर Love Bite गालावर किस, Jacqueline - Sukeshचा नवीन फोटो लीक

२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline fernandez ) आणि तिचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर (Sukesh chandrashekhar)  चांगलेच चर्चेत आले होते. ईडी (ED) कडून जॅकलीनला समन्स बजावण्यात आले असून जॅकलीनची सध्या ईडीकडून कसून चौकशी आहे. जॅकलीन विरोधीत लुकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली. मात्र जॅकलीनच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण जॅकलीन सुकेश प्रेम प्रकरणातील आणखी एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे.  (Jacqueline fernandez Sukesh chandrashekhar new photo leaked)  जॅकलीन सुकेशच्या प्रायव्हेट फोटोमुळे दोघांच्याही अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cinema Beast🤘 (@beast_cinema)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुकेश जॅकलीनच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर जॅकलीनच्या मानेवर लव्ह बाइट देखील दिसत आहे. जॅकलीनने यात प्रिंटेट टॉप तर सुकेशने हुडी घातली आहे. जॅकलीन सुकेशचा याआधी एक मिरर सेल्फी व्हायरल झाला होता. जॅकलीनने दोघांना एक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्या फोटोमुळे खरंतर जॅकलीनचे नाव २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात गोवले गेले.


सुकेश आणि जॅकलीनचा प्राइव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जॅकनीलने सोशल मीडियावर सर्वांना आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने असे म्हटले आहे की, ‘या देशाने इथल्या लोकांनी नेहमीच मला प्रेम दिले. यात माझ्या सोशल मीडिया फॅमिलीचाही समावेश आहे. सर्वांकडून मी खूप काही शिकले. मी सध्या फार वाईट काळातून जात आहे. मला आशा वाटते की माझे सर्व मित्र मैत्रीणी मला यातून बाहेर काढतील. माझ्या सोशल मीडिया फॅमिलीतील सर्वांना माझी एकच विनंती आहे की, माझ्या प्रायव्हसीची काळजी घ्या, माझे वैयक्तिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नका. तुमच्या जवळच्या व्यक्तींना हे फोटो शेअर करू शकता. मला आशा आहे की तुम्ही माझ्याशी पुन्हा असे वागणार नाहीत. मला न्याय मिळेल अशी मी आशा करते’.

२०० कोटी खंडणी प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या सुकेशवर७००० पानांच्या चार्टशीट दाखल करण्यात आले. ज्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव होते. या केसमधील मास्टर माइंड कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने २०० कोटी रुपयांमधील १० करोड रुपये जॅकलीनवर खर्च केले. सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट्स दिले होते. ज्यात लग्झरी गाड्या, ५२ लाखांचा घोडा, चार पर्शियन मांजरी आणि अनेक महागड्या वस्तूंचा समावेश आहे.


हेही वाचा – Money Laundering Case : जॅकलिन खोटारडी…, ईडी चौकशीत सुकेश चंद्रशेखरने केला धक्कादायक खुलासा